शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर भारतासाठी इराणने होर्मुझ सामुद्रधुनी केली खुली; इंधन टंचाई संकटातून मिळणार दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 06:44 IST

पश्चिम आशिया हा भारताच्या तेल, वायू पुरवठ्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली/तेहरान : इराणनेभारतासह चीन आणि रशियासारख्या काही मित्र देशांना व्यापारी जहाज वाहतुकीसाठी होर्मुझ सामुद्रधुनीचा वापर करण्यास परवानगी दिली असल्याचे इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी गुरुवारी सांगितले. यामुळे भारतावर आलेल्या इंधन टंचाईच्या संकटातून दिलासा मिळणार आहे.

पर्शियन आखात आणि ओमानच्या आखातादरम्यान अरुंद जलमार्ग असलेल्या होर्मूझ सामुद्रधुनीतून जगातील सुमारे २० टक्के तेल आणि द्रवरूप नैसर्गिक वायूची (एलएनजी) वाहतूक होते. इराणने या मार्गातून प्रवास करण्यावर निर्बंध लादल्याने जागतिक तेल आणि वायूच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. 

पश्चिम आशिया हा भारताच्या तेल, वायू पुरवठ्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. आमचे मित्र असलेल्या भारत, चीन, रशिया, इराक, पाकिस्तान या देशांच्या जहाजांना होर्मूझ सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे अराघची यांनी इराण सरकारच्या चित्रवाहिनीला सांगितले. मात्र आमचे शत्रू असलेले देश व त्यांच्या मित्रदेशांच्या जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी देणार नाही, असेही अराघची यांनी स्पष्ट केले. गेल्या काही आठवड्यांत भारताने पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यास आणि होर्मूझ सामुद्रधुनीतून इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न केले आहेत.

इंधन टंचाईबद्दल अफवा पसरवाल तर कारवाई होणार

नवी दिल्ली/मुंबई : देशात इंधन तुटवडा नसून भारताकडे ६० दिवसांचा इंधनसाठा उपलब्ध आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले. इंधनटंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या बातम्या या जाणीवपूर्वक पसरवलेली दिशाभूल असून, अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला सरकारने आहे. मात्र, महाराष्ट्रासह देशभरातील विविध शहरांमधील पेट्रोल पंपांवर दिवस-रात्र रांगा असून, पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran Opens Hormuz Strait for India, Easing Fuel Crisis.

Web Summary : Iran allows India, China, Russia access to Hormuz Strait, easing fuel concerns. Amidst shortage rumors, India assures 60-day fuel stock, warns against misinformation.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIndiaभारतIndiaभारतIranइराणCentral Governmentकेंद्र सरकारFuel Crisisइंधन टंचाईFuel Hikeइंधन दरवाढLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाई