शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

एका आठवड्यात आपले उत्तर कोर्टात दाखल करा, बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 06:05 IST

Baba Ramdev: आपल्या औषधी उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण व योगगुरु बाबा रामदेव यांनी मागितलेली बिनशर्त माफी हा निव्वळ शब्दांचा खेळ आहे, असे सांगत ती माफी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नाकारली.

नवी दिल्ली - आपल्या औषधी उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण व योगगुरु बाबा रामदेव यांनी मागितलेली बिनशर्त माफी हा निव्वळ शब्दांचा खेळ आहे, असे सांगत ती माफी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नाकारली. तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असे म्हणत  या दोघांनी एका आठवड्यात सविस्तर उत्तर दाखल करावे, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.

या जाहिरातींमुळे बाबा रामदेव व आचार्य बाळकृष्ण यांच्या विरुद्ध अवमानाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस त्यांना बजावण्यात आली होती. त्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी ते दोघेही न्यायालयात हजर होते. आपले सविस्तर उत्तर सादर करण्यासाठी या दोघांना शेवटची संधी देण्यात येत आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने बजावले आहे.

दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणार नाही अशी पतंजली आयुर्वेदने न्यायालयाला दिलेली हमी पाळण्यात आली नाही हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. या कंपनीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. पतंजली कंपनी तसेच बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांच्यावर खोट्या साक्षीबद्दलही कारवाई होऊ शकते, असा इशाराही न्यायालयाने दिला.

केंद्र सरकार डोळे बंद करून का बसले होते?या प्रकरणाची पुढील सुनावणी १० एप्रिलला असून, त्यादिवशी दोघांनीही हजर राहावे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्या. हिमा कोहली यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्र सरकारलाही धारेवर धरले. कोरोना साथीच्या काळात पतंजली आयुर्वेद आपल्या औषधी उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करत असताना व त्यातून ॲलोपॅथीची बदनामी होत असताना केंद्र सरकार डोळे बंद करून का बसले होते असा सवाल न्यायालयाने केंद्र सरकारला केला. 

परिणाम भोगण्यासाठी तयार राहा : कोर्टउत्पादनांच्या जाहिराती करताना कायद्याचा भंग करणार नाही अशी हमी पतंजलीने न्यायालयाला २१ नोव्हेंबर रोजी दिली होती. औषधाच्या गुणवत्तेविषयी पुराव्याशिवाय कोणतेही विधान करणार नाही, कोणत्याही औषध प्रणालीची बदनामी करणार नाही, असेही या कंपनीने सांगितले होते. या हमीचे पालन करणे हे पतंजली आयुर्वेदचे कर्तव्य होते, असे न्यायालयाने म्हटले होते. दरम्यान, औषधे, प्रशासने (जादुई उपाय) कायदा जुनाट आ हा आचार्य बाळकृष्ण यांच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला. बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांना परिणाम भोगण्यासाठी तयार राहण्याचा इशाराही खंडपीठाने यावेळी दिला.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय