Fight In Air India Flight : हाणामारी करणाऱ्या प्रवाशाला सोडून विमान लंडनला झेपावले; आरोपीविरोधात एपआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 14:09 IST2023-04-10T14:00:03+5:302023-04-10T14:09:23+5:30
Fight In Air India Flight: लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात प्रवाशाने क्रू मेंबरसोबत मारामारी केल्याची माहिती समोर आली आहे.

Fight In Air India Flight : हाणामारी करणाऱ्या प्रवाशाला सोडून विमान लंडनला झेपावले; आरोपीविरोधात एपआयआर दाखल
Fight In Air India Flight : गेल्या काही महिन्यांपासून विमानात प्रवाशांच्या गैरवर्तनाच्या घटना वाढल्या आहेत. आता ताजी घटना दिल्लीहूनलंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात घडली आहे. यावेळी प्रवासी आणि चालक दलातील सदस्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर तात्काळ विमान दिल्लीला वळवण्यात आले. या घटनेनंतर दिल्ली विमानतळ पोलिसांनी तक्रार नोंदवली असून प्रवाशाला विमानतळावरच थांबवण्यात आले आहे. यानंतर दुपारी हे विमान लंडनच्या दिशेने झेपावले.
एअर इंडियाचे विमान (AI-111) दिल्लीहून सकाळी 6.35 वाजता उड्डाण केले. टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच प्रवासी आणि क्रू मेंबरमध्ये वाद झाला. त्यानंतर विमानाला दिल्लीला परतावे लागले. विमान दिल्लीला परतल्यानंतर विमानतळ पोलिसांनी त्या गोंधळ घालणाऱ्या प्रवाशाविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर क्रू मेंबरने त्या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केले. एअर इंडियाच्या वतीने प्रवाशाविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेबाबत एअर इंडियाने सांगितले की, दिल्लीहून लंडनच्या हिथ्रोला जाणाऱ्या फ्लाइटमधील एका प्रवाशाच्या बेजबाबदार वर्तनामुळे विमान टेक ऑफ केल्यानंतर लगेचच दिल्लीला परतले. प्रवाशआला सोडून हे विमान पुन्हा एकदा लंडनच्या दिशेने निघाले. कंपनीने सांगितले की, प्रवाशाला सुरुवातीला इशारा देण्यात आला, पण त्याचे वर्तन सुधारले नाही. या घटनेनंतर लंडनसाठी फ्लाइटच्या वेळा पुन्हा शेड्युल करण्यात आल्या आहेत.
विमानात अशा घटना वाढल्या
गेल्या काही दिवसांत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. यातील 'पी स्कँडल' हे प्रकरण सर्वाधिक गाजले होते. बहुतांश घटना देशाबाहेर उड्डाण करणाऱ्या विमानांमध्ये दिसून आल्या आहेत. अशा घटना रोखण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि विमान कंपन्यांनी अनेक पावले उचलली आहेत.