शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरच झाली महिलेची प्रसूती

By admin | Updated: March 13, 2017 14:04 IST

एक भिकारीन त्या महिलेच्या मदतीसाठी पुढे आली आणि तिनेच त्या महिलेची प्रसूती केली

ऑनलाइन लोकमतबंगळुरू, दि. 13 - भारतीय समाजात मानवतेची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. बंगळुरूत रस्त्याच्या मधोमध माणुसकीचं दर्शन घडलं आहे. रस्त्यावरच एका महिलेला प्रसूती कळा येण्यास सुरुवात झाली. आजूबाजूला मदतीसाठी कोणीही उपस्थित नसल्याचं पाहता क्षणी एक भिकारीन त्या महिलेच्या मदतीसाठी पुढे आली आणि तिनेच त्या महिलेची प्रसूती केली. त्यामुळे सर्वांचेच डोळे भरून आले. 30 वर्षीय येलम्माची मुलगी होण्याची इच्छा पूर्ण झाली. मात्र ती फक्त एका जंक्शनच्या रोडवर. त्यानंतर एका स्थानिक आमदारानंही प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या शहरात ही सुंदर घटना घडली आहे. आई आणि मुलगी सुखरूप आहे, अशी माहिती स्थानिक आमदार बल्लाटगी यांनी दिली आहे. सन्ना बाजार येथे वास्तव्याला असलेल्या रमन्ना आणि त्यांची पत्नी येलम्मा यांना तीन मुलगे आहेत. मात्र त्यांना ब-याच काळापासून एका मुलीची प्रतीक्षा होती. गर्भारपणाचे 36 आठवडे पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रायचूर येथे जाण्याचा सल्ला दिला. दोघेही रायचूर येथे जात असताना येलम्मा यांना जोरजोरात प्रसूती कळा येऊ लागल्या आणि त्या गाडीतून उतरल्या. रस्त्यावर पडून जोरजोरात ओरडू लागल्या. पतीही पत्नीला अशा अवस्थेत पाहून घाबरला. मात्र शेजारील एका भिकारनीनं त्या महिलेला बाळाला जन्म देण्यासाठी मदत केली. त्यानंतर जवळपासच्या सर्वच महिला गोळा झाल्या. महिलेनं सृदृढ बाळाला जन्म दिला. येलम्मा यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र येलम्माची प्रसूती करणारी भिकारी महिला तिथून अचानक गायब झाली. या घटनेनं सगळीकडे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.