संरक्षण क्षेत्रातील एफडीआयची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढणार

By Admin | Updated: July 10, 2014 15:18 IST2014-07-10T14:00:48+5:302014-07-10T15:18:47+5:30

संरक्षण व विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीत (एफडीआय) वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी जाहीर केला.

FDI limit in defense sector will increase to 49% | संरक्षण क्षेत्रातील एफडीआयची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढणार

संरक्षण क्षेत्रातील एफडीआयची मर्यादा ४९ टक्क्यांपर्यंत वाढणार

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १० -  संरक्षण व विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीत (एफडीआय) वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी जाहीर केला. संरक्षण तसेच विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीत २६ टक्क्यांवरून ४९ टक्के इतकी वाढ करण्यात येणार आहे. संरक्षण साहित्य निर्मितीमधील परकीय गुंतवणूकीची मर्यादा वाढणार असली तरी, संयुक्त प्रकल्पात मालकी हक्क भारतीय कंपन्यांकडेच रहातील असेही जेटली यांनी स्पष्ट केले. दरम्यान यावर्षी संरक्षण खात्यासाठी २.३९ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 
 
 

 

Web Title: FDI limit in defense sector will increase to 49%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.