Crime: मुलीला तरुणासोबत 'नको त्या अवस्थेत' पाहिलं; संतापलेल्या वडिलांनी जे केलं, त्याची गावभर चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 15:23 IST2025-10-20T15:20:41+5:302025-10-20T15:23:45+5:30
Odisha Dhenkanal Murder News: ओडिशातील ढेंकनाळ जिल्ह्यातील दाद्राघाटी पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना घडली.

Crime: मुलीला तरुणासोबत 'नको त्या अवस्थेत' पाहिलं; संतापलेल्या वडिलांनी जे केलं, त्याची गावभर चर्चा!
ओडिशातील ढेंकनाळ जिल्ह्यातील दाद्राघाटी पोलीस स्टेशन हद्दीतील मोहनपाशी गावात शनिवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली. मुलीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर एका व्यक्तीने तरुणाची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह कालव्याच्या काठावर फेकून दिला. या हत्येनंतर आरोपी वडिलांनी दाद्राघाटी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रूपा पिंगुआ याने मृत तरुण करुणाकर बेहेरा याला त्याच्या मुलीसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले. करुणाकर, जो अखुआपाडा पंचायतीच्या क्रमांक १ कॉलनीचा रहिवासी असून मोहनपाशी गावात जेसीबी मशीन हेल्पर म्हणून काम करत होता. पिंगुआला वाटले की करुणाकर त्यांच्या मुलीवर जबरदस्ती करत आहे किंवा लैंगिक अत्याचार करत आहे. यामुळे भडकलेल्या पिंगुआने करुणाकरवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
स्थानिक सूत्रांनुसार, मृत तरुण करुणाकर आणि आरोपीची मुलगी यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, वडिलांनी त्यांना त्या स्थितीत पाहताच ते संतापले आणि त्यांनी तरुणाची हत्या केली. हत्येनंतर आरोपी रूपा पिंगुआ याने करुणाकरचा मृतदेह गावातील एका कालव्याजवळ फेकून दिला. त्यानंतर त्याने थेट दाद्राघाटी पोलीस ठाण्यात गाठून आत्मसमर्पण केले.
घटनेची माहिती मिळताच मृत करुणाकरचे वडील काशीनाथ बेहरा आणि कुटुंबातील इतर सदस्य मोहनपाशी गावात पोहोचले. त्यांनी आरोपी रूपा पिंगुआवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी आरोपी रूपा पिंगुआला ताब्यात घेतले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.