धक्कादायक! बाप वर्षभर करत होता मुलीवर अत्याचार; लेकीनं मृत बाळाला दिला जन्म अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 11:31 AM2020-05-16T11:31:39+5:302020-05-16T11:44:37+5:30

52 वर्षीय वडील 23 वर्षाच्या पोटच्या मुलीवर गेले वर्षभर अत्याचार करत होता.

The father had been Sexual harassment his daughter for one years in haryana mac | धक्कादायक! बाप वर्षभर करत होता मुलीवर अत्याचार; लेकीनं मृत बाळाला दिला जन्म अन्... 

धक्कादायक! बाप वर्षभर करत होता मुलीवर अत्याचार; लेकीनं मृत बाळाला दिला जन्म अन्... 

Next

संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 84,712 वर पोहचली आहे. तर 2700 हून अधिक लोंकचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. मात्र एकीकडे देश कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

हरियाणातील पंचकूला जिल्ह्यामधील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 52 वर्षीय वडील 23 वर्षाच्या पोटच्या मुलीवर गेले वर्षभर अत्याचार करत होता. मुलगी मतिमंद असल्याचा फायदा वडिलांनी घेतला आणि एका रुममध्ये बंद करुन तिच्यावर वारंवार अत्याचार करत होता. पीडित मुलीला रक्तस्त्राव सुरु झाल्यामुळे आई तिला रुग्णालयात घेऊन गेली. त्यानंतर पीडित मुलीने 9 महिन्याच्या मृत बाळाला जन्म दिला. रुग्णालयाच्या प्रशासनाने या संबंधित सर्व माहिती स्थानिक पोलिसांना दिली. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांवर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी पीडित मुलीवर वारंवार मुलीवर अत्याचार करत होता. तसेच आरोपीला तीन मुली आणि दोन मुलं आहे. गेल्या दीड वर्षापूर्वी हे कुटुंब गावात आले होते. हा सर्व प्रकार लपवण्यासाठी आरोपी मुलीला घराबाहेर पडू द्यायचा नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच पीडित मुलीला एका रुममध्ये कोंडून ठेवण्यात आले होते. तसेच तिला तिकडेच जेवण दिले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलांनी त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली.

Web Title: The father had been Sexual harassment his daughter for one years in haryana mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.