शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त वडिलांना सायकलवर बसवून केला १२०० किमीचा प्रवास; पंधरा वर्षे वयाच्या मुलीचे धाडस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 23:44 IST

हरियाणातून बिहारपर्यंत मारली मजल, सायकलिंग फेडरेशनने घेतली दखल

पाटणा : लॉकडाऊनमुळे रेल्वे तसेच सार्वजनिक , खासगी वाहतूक व्यवस्था बंद असल्याने पंधरा वर्षांची एक मुलगी आपल्या आजारी वडिलांना सायकलवर मागे बसवून हरियाणातील सिकंदरपूरहून १२०० किमीचा व सलग आठ दिवसांचा प्रवास करत बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात घेऊन आली. तिच्या अनोख्या धाडसाची कहाणी उजेडात येताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका हिनेही समाजमाध्यमांवर तिचे कौतुक केले आहे.

मूळ बिहारची रहिवासी असलेल्या या मुलीचे नाव ज्योतीकुमारी पासवान असे आहे. वडिलांसाठी तिने दाखविलेल्या धाडसाबद्दल सर्वजण प्रभावित झालेच पण सायकल चालविण्याच्या तिच्या कौशल्यालाही अनेकांनी दाद दिली. ज्योतीकुमारी पासवानला सायकलिंगचे योग्य प्रशिक्षण मिळाल्यास स्पर्धांमध्ये ती उत्तम खेळाडू म्हणूनही नाव कमावेल अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. त्यानुसार सायकलिंग फेडरेशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष ओंकारसिंग यांनी तिला भेटण्यास बोलावले. तिने १२०० किमीचा प्रवास सायकल चालवत कसा केला, याचा तपशील जाणून घेतला. ज्योतीला सायकलिंगचे उत्तम प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन ओंकारसिंग यांनीदिले आहे.

आपल्या वडिलांना ज्योती ज्या सायकलवर घेऊन आली ती गुलाबी रंगाची सेकंड हँड सायकल तिने दोन हजार रुपयांना विकत घेतली होती. तिला उत्तम सायकलपटू होण्यासाठी अनेकांनी आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. ज्योतीचे वडील मोहन हे ई-रिक्षाचे चालक असून एका अपघातामध्ये त्यांच्या गुडघ्याला मोठी दुखापत झाली होती. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. प्रकृती बरी नाही, त्यातच लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे मोहन यांचा रोजगार बुडाला.

दोन वेळच्या जेवणाला मोदात होण्याची वेळ आल्याने हरियाणातून बिहारमधील आपल्या जन्मगावी जाण्याचा त्यांनी विचार केला. पण सर्व वाहतूक स्थगित करण्यात आल्यामुळे ते व ज्योती हरियाणातील सिकंदरपूरमध्येच अडकून पडले. तिथून बिहारला मूळ गावी जाण्यासाठी मग ज्योतीनेच शक्कल लढविली. तिने आपल्या वडिलांना सायकलवर मागे बसवून पँडल मारत १२०० किमीचा प्रवास आठ दिवसांत हिकमतीने पार पाडला. 

सर्व कुटुंब पुन्हा एकत्र झाले

मोहन यांची पत्नी बिहारमधील गावामध्ये अंगणवाडी सेविकेचे काम करते. त्यांची मोठी मुलगी व जावई हे फेब्रुवारीमध्येच गावी परतले आहेत. या प्रवासात ज्योती व तिचे वडील मोहन हे काही तास पालवाल, आग्रा, मथुरा येथे थांबले होते. थोडीशी विश्रांती घेऊन मग ते पुढच्या प्रवासाला निघत. ते दोघेही गावाला परतल्याने आता सारे कुटुंबीय पुन्हा एकत्र नांदत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहार