Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 20:22 IST2025-08-13T20:21:07+5:302025-08-13T20:22:54+5:30

Fatehpur Tomb News: उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये असलेल्या एका मकबऱ्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न झाला. हिंदू संघटनेशी संबंधित कार्यकर्त्यांनी मकबऱ्यावर भगवे झेंडे लावण्याचाही प्रयत्न केला. 

Fatehpur Tomb Controversy: Who is Nawab Abdul Samad, whose tomb is claimed to have a temple? | Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?

Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?

उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये एक घटना घडली. या घटनेने १९९२ मध्ये अयोध्येत झालेल्या बाबरी मशीद विध्वंसाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. फतेहपूरमध्ये एक मकबरा आहे. या मकबऱ्याच्या ठिकाणी मंदिर असल्याचा दावा करत काही हिंदू संघटनांचे कार्यकर्ते घुसले. त्यांनी मकबऱ्या भगवे झेंडे लावण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी वेळीच त्यांना अडवल्याने तणावाला कारणीभूत होईल अशी घटना टळली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

फतेहपूरच्या अबूनगर भागात हा मकबरा आहे. हा मकबरा आहे, नवाब अब्दुल समद यांचा. त्या जागी मंदिर असल्याचा दावा आता केला जात आहे. ११ ऑगस्ट रोजी या मकबऱ्यामध्ये घुसण्याचाही प्रयत्न झाला. या मकबऱ्याच्या चर्चेमुळे नवाब अब्दुल समद यांच्याबद्दलही चर्चा सुरू झाली. 

कोण होते नवाब अब्दुल समद?

मुस्लीम पक्षकारांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे, हा मकबरा ५०० वर्षे जुना आहे. हा मकबरा अकबराच्या नातवाने बांधला होता. स्थानिकांनी सांगितले की, या जागेची नोंद कागदोपत्री आहे. शासकीय दस्तऐवजांमध्ये मकबरा मांगी म्हणून जागेची नोंद आहे. 

या मकबऱ्यामध्ये अबू मोहम्मद आणि नवाब अब्दुल समद यांचे थडगे आहे. अब्दुल सम खान हे लाहौरमधील एक सुभेदार होते. मुगलाच्या सैन्यामध्ये त्यांचा आदर केला जायचा. १८ व्या शतकात ज्या प्रांतिक लढाया झाल्या, त्यात अब्दुल समद यांचीही भूमिका राहिलेली आहे. त्यांच्याच नावाने फतेहपूरमध्ये हा मकबरा बनवला गेला होता. इथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले गेले आहेत. 

वाद कसा वाढला?

८ ऑगस्ट रोजी हिंदू संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज दिला. या अर्जामध्ये म्हटले होते की, फतेहपूरमध्ये अब्दुल समदचा मकबरा हा मूळ मकबरा नाहीये. ते एक शिवमंदिर आहे. कारण आतील भिंतींवर त्रिशुळ, बेलपत्र, कमळाचे फूल आणि शिवाचे प्रतिक बनवलेले आहे. 

११ ऑगस्ट रोजी या जागेची साफसफाई करून तिथेच जन्माष्टमी साजरी केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटलेले होते. त्यासाठी परवानगीही मागितली होती. पण, जिल्हाधिकाऱ्यांनी याला परवानगी नाकारली. असे काही केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला. 

हिंदू संघटनांनी दिलेल्या अर्जानंतर फतेहपूरमध्ये पोलीस आणि प्रशासन सतर्क झाले होते. त्यानंतर या मकबऱ्याच्या परिसरात बॅरिकेटिंग केले गेले. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष मुखलाल पाल यांनी मकबऱ्यामध्ये जाऊन पूजा आणि आरती करणारच अशी भूमिका घेतली आणि त्यामुळे तणाव वाढला. 

मकबऱ्या घुसून पूजा आणि...

११ ऑगस्ट रोजी पोलीस बंदोबस्त असतानाही हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मकबऱ्यामध्ये घुसले. बॅरिकेटवरू आतमध्ये गेल्यावर त्यांनी भगवे झेंडे फडकावण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मकबऱ्यामध्ये पूजा आणि आरतीही केली. त्यामुळे तणाव वाढला आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर प्रकरण इतके चिघळले की, १० पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना बोलवण्यात आले होते. 

Web Title: Fatehpur Tomb Controversy: Who is Nawab Abdul Samad, whose tomb is claimed to have a temple?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.