Fate is like rape enjoy if you cant resist Kerala MPs wife Facebook post sparks controversy | 'नशीब बलात्कारासारखं असतं, त्याला रोखू शकत नसाल तर आनंद घ्या'

'नशीब बलात्कारासारखं असतं, त्याला रोखू शकत नसाल तर आनंद घ्या'

काँग्रेस खासदाराच्या पत्नीनं लिहिलेल्या फेसबुक पोस्टमुळे वादंग माजला आहे. केरळमधील काँग्रेस खासदार हिबी एडन यांच्या पत्नीची फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. नशीब बलात्कारासारखं असतं. त्याला रोखू शकत नसाल, तर त्याचा आनंद घ्या, अशी पोस्ट हिबी एडन यांच्या पत्नी अन्ना यांनी लिहिली आहे. या पोस्टवरुन मोठा वाद झाल्यावर अन्ना यांनी पोस्ट डिलीट करुन माफी मागितली. 

मंगळवारी सकाळी अन्ना लिंडा एडन यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यासोबत त्यांनी पती हिबी ईडन यांचा फोटोदेखील शेअर केला. 'नशीब बलात्कारासारखं असतं. त्याला रोखू शकत नसाल, तर त्याचा आनंद घ्या,' असं शीर्षक त्यांनी फोटो आणि व्हिडीओला दिलं होतं. सध्या कोच्चीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोच्ची शहराचा बराचसा भाग पाण्याखाली आहे. अन्ना एडन यांची पोस्ट पावसाशी संबंधित असल्याचं अनेकांना वाटत आहे. एडन यांनी शेअर केलेला एक फोटो कोच्चीतील पूर परिस्थिती दाखवणारा आहे. एडन यांनी फोटो पोस्ट करून कोच्चीतील पुराचा खिल्ली उडवल्याचा आरोप होत आहे. अन्ना एडन यांच्या पोस्टनं सोशल मीडियावर वादळ निर्माण झालं. अनेकांनी त्यांच्या पोस्टवर सडकून टीका केली. यानंतर अन्ना यांनी त्यांची पोस्ट डिलीट केली आणि माफी मागितली. अन्ना यांचे पती हिबी एडन केरळच्या एर्नाकुलम लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. त्यांनी यंदा पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक जिंकली. त्याआधी ते काँग्रेसचे आमदार होते. लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ केरळमध्येच समाधानकारक कामगिरी करता आली. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fate is like rape enjoy if you cant resist Kerala MPs wife Facebook post sparks controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.