ट्रक अन् पिकअपचा भीषण अपघात, ६ जागीच ठार; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 21:44 IST2023-02-01T21:43:51+5:302023-02-01T21:44:23+5:30
ऊसाने भरलेला ट्रक आणि मजूरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन या दोघांमध्ये भीषण धडक झाली.

ट्रक अन् पिकअपचा भीषण अपघात, ६ जागीच ठार; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
बुऱ्हानपूर - महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर मध्यप्रदेशच्या देडतलई येथे ट्रक व चार चाकी पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. धारणी भोकरबर्डी पुढे देडतलई शेखपुरा रोडवर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर जखमींना बुऱ्हानपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी घटनेची दखल घेत प्रशासनाला सर्वोतोपरी मदतीचे निर्देश दिले आहेत.
ऊसाने भरलेला ट्रक आणि मजूरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन या दोघांमध्ये भीषण धडक झाली. दोन्ही वाहनाची समोरा समोर धडक झाल्याने अपघातात ६ जणांना जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की सर्वच मृतदेह रस्त्यावरच पडल्याचे दिसून आले. त्यानंतर, अपघातातील सर्व जखमींना मध्य प्रदेशातील खंडवा बुरहानपुर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. सर्व मजूर हे ऊस कापणी करून बुऱ्हानपूर येथे जात होते. सर्व मृतक व जखमी हे मध्य प्रदेशमधील रहिवाशी आहेत. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, अपघात कोणाच्या चुकीमुळे झाला त्याचा, तपास मध्यप्रदेश पोलीस करीत आहेत.
मुख्यमंत्री श्री @ChouhanShivraj ने दुर्घटना से प्रभावित परिवारों की आर्थिक सहायता के निर्देश बुरहानपुर जिला प्रशासन को दिए हैं। घायलों का उपचार बुरहानपुर में चल रहा है। मुख्यमंत्री श्री चौहान ने सड़क दुर्घटना में घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना की है।
— Chief Minister, MP (@CMMadhyaPradesh) February 1, 2023
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रशासनाला मदतीचे निर्देश दिले आहेत. तसेच, दुर्घटनेतील पीडित आणि जखमींना आर्थिक मदत देण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत.