हिमाचलमध्ये भीषण अपघात, ६ जणांचा मृत्यू, ६ जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 13:36 IST2023-12-04T13:34:32+5:302023-12-04T13:36:13+5:30

हिमाचल येथील शिमला येथे मजदुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचा मोठा अपघात झाला.

Fatal accident in Himachal, 6 dead, 6 seriously injured | हिमाचलमध्ये भीषण अपघात, ६ जणांचा मृत्यू, ६ जण गंभीर जखमी

हिमाचलमध्ये भीषण अपघात, ६ जणांचा मृत्यू, ६ जण गंभीर जखमी

हिमाचल येथील शिमला येथे मजदुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचा मोठा अपघात झाला. या अपघातात ६ मजदुरांचा मृत्यू झाला असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी मदतीसाठी पोलिस आणि स्थानिक पोहोचले आहेत, सध्या पोलीस अपघाताचा तपास करत आहेत. अपघाताची कारणे समजू शकलेली नाहीत.

जखमींवर सुन्नी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात ठार झालेले लोक मजूर आहेत. शिमला एएसपी नवदीप सिंह यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

तेलंगणात काँग्रेसला सत्ता; पण, मोहम्मद अझहरुद्दीनचा १६ हजारांनी पराभव

मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी शिमल्यापासून ५० किमी अंतरावर मंडी जिल्ह्याच्या सीमेवर सुन्नी शहर आहे. सुनीतील कादरघाट येथे हा अपघात झाला आहे. येथे एका पिकअप वाहनाला अपघात झाला, यात एकूण ३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३ जखमींचा सुन्नी रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झाला. या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी झाला. सर्व गंभीर जखमींना उपचारासाठी सुन्नी रुग्णालयात आणण्यात आले आहे.

सुनी ते किंगल जोडणाऱ्या लिंक रोडवर आज सकाळी ७ वाजता हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. पिकअपमध्ये चालकासह १२ जण कडाघाटातील बाजाराकडे जात होते. कादरघाटापासून काही अंतरावर पिकअप खोल दरीत पडली. या अपघाताची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली आणि गावकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी सर्व जखमींना सुन्नी हॉस्पिटलमध्ये नेले, सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Fatal accident in Himachal, 6 dead, 6 seriously injured