हाथरसमध्ये भीषण अपघात; तेराव्याहून परतणाऱ्या ११ जणांचा मृत्यू, मॅक्सची बसला धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 20:19 IST2024-09-06T20:19:41+5:302024-09-06T20:19:48+5:30
मॅक्समध्ये तब्बल ३५ लोक बसलेले होते.

हाथरसमध्ये भीषण अपघात; तेराव्याहून परतणाऱ्या ११ जणांचा मृत्यू, मॅक्सची बसला धडक
हाथरसमध्ये भीषण अपघात झाला आहे. नातेवाईकाच्या तेराव्याला जाऊन घरी परतणाऱ्या लोकांच्या वाहनाला अपघात झाला असून यात ११ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
चांदपा परिसरातील कपुरा चौकात हा अपघात झाला आहे. बसची मॅक्सला धडक बसली आहे. यात दोन्ही वाहनांतून प्रवास करणाऱ्या ११ जणांचा मृत्यू झाला. तर १६ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
अपघातात जखमी झालेल्या आग्र्याच्या खंडौली येथील रहिवासी असलेल्या शबानाने सांगितले की, आजीच्या तेराव्याला सर्वजण गेले होते. मॅक्समध्ये तब्बल ३५ लोक बसलेले होते.
जखमींना जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमींना अलीगढला पाठविण्यात आले आहे.