शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१ डिसेंबरपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर ‘फास्ट टॅग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 06:32 IST

ऑनलाइन टोल भरण्यासाठी स्वतंत्र मार्गिका; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा देशभरात उपक्रम

मुंबई : राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे टोल नाक्यांवर अनेक वेळा रांगेत तिष्ठत राहावे लागते. त्यामुळे वाहनधारकांचा वेळ वाया जातो, ते टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून वाहनधारकांसाठी ‘फास्ट टॅग’ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. आगाऊ स्वरूपात, ऑनलाइन, कॅशलेस टोल भरणाऱ्या वाहनांना स्वतंत्र मार्गिकेतून कुठल्याही अडथळ्याविना बाहेर पडता येईल.१ नोव्हेंबरपासून प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविला जात असून येत्या १ डिसेंबरपासून तो नियमित स्वरूपात कार्यान्वित केला जाणार आहे.या उपक्रमामुळे वाहनधारकांचा वेळ, पैशांची मोठी बचत होणार असल्याचा दावा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केला. प्राधिकरणाचे विभागीय मुख्य महाव्यवस्थापक राजीव सिंग यांनी सांगितले की, सर्व टोल नाक्यांवर तसेच प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर आणि विविध बॅँकांमध्ये ऑनलाइन रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. वाहनांना ‘फास्ट टॅग’ दिला जाईल. गाडीच्या पुढील दर्शनी भागावर तो लावायचा असून त्याची नोंदणी टोल नाक्यावरून पास होताना तेथील मशीनद्वारे स्वतंत्रपणे होईल. त्यामुळे अडथळ्याविना गाडी पुढे निघून जाईल.प्रायोगिक तत्त्वावर १ नोव्हेंबरपासून हा उपक्रम सुरू होईल. त्यासाठीच्या कार्डसाठी अनामत रक्कम म्हणून किमान शंभर रुपये शुल्क घेतले जात असून शुक्रवारपासून ३० नोव्हेंबरपर्यंत मोफत नोंदणी करून घेतली जाईल. वाहनधारकांना किमान ५०० रुपये आणि त्याहून कितीही रक्कम आगाऊ टोलच्या स्वरूपात भरता येईल. १ डिसेंबरपासून अनामत रक्कम ५०० रुपये होईल. रक्कम भरण्याची सुविधा सर्व टोल नाके, प्राधिकरणाचे संकेतस्थळ आणि सहा बॅँकांमध्ये आहे. मोबाइलवर रक्कम भरण्यासाठी ‘माय फास्ट टॅग’ हे अ‍ॅपही आहे. या सुविधेचा वापर करणाºयांना नियमित टोल दरात अडीच टक्के सवलत मिळेल, ही रक्कम त्यांच्या कार्डवर जमा होत राहील. एक कार्ड साधारण पाच वर्षे वापरता येईल. काही महिन्यांनंतर राज्य सरकारकडून राज्य महामार्गावरही अशा पद्धतीने टोल भरण्याची सुविधा उपलब्ध केली जाईल, असे सिंग यांनी सांगितले. या सुविधेबरोबरच पूर्वीप्रमाणे ‘ईटीसी’द्वारे रोख अथवा एटीएमद्वारे टोल वसुलीही सुरू राहील, असेही सिंग यांनी स्पष्ट केले.‘फास्ट टॅग’मध्ये शुल्क न भरता घुसखोरी केल्यास दुप्पट वसुली‘फास्ट टॅग’च्या मार्गिकेसाठी शुल्क न भरता त्या ‘लेन’मध्ये प्रवेश करणाºया वाहनांकडून दुप्पट वसुली केली जाईल. त्याबाबतचा अध्यादेश केंद्र सरकारने जारी केला आहे. त्यामुळे या मार्गिकेचा वापर केवळ आगाऊ स्वरूपात रक्कम जमा करणाºयांना करता येईल.पश्चिम विभागांतर्गत १९ टोल नाकेराष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम विभागीय कार्यालयांतर्गत पुणे-बंगळुरू, मुंबई-गोवा, सोलापूर हे महामार्ग येत असून त्यामध्ये सरासरी ३५०० किलोमीटर मार्ग आहे. त्यापैकी १८०० किमी मार्गावर प्रकल्प सुरू असून उर्वरित मार्गावर विविध प्रकल्प राबविले जातील. याअंतर्गत एकूण १९ टोलनाक्यांचा समावेश आहे. त्यापैकी १५ ठिकाणी ‘ईटीसी’द्वारे टोल घेतला जातो. १ डिसेंबरपासून सर्व १९ टोलनाक्यांवर ‘फास्टटॅग’ सुविधा कार्यान्वित केली जाईल.

टॅग्स :tollplazaटोलनाका