शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

सरकारचा कायदा स्थगितीचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला, गणतंत्रदिनी रिंग रोडवर ट्रॅक्टर रॅली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 2:06 AM

शेतकरी नेते दर्शन पाल यांनी सांगितले की, संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत सरकारचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. तीनही कृषी कायदे पूर्णपणे रद्द करणे आणि सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देण्यासाठी एक कायदा बनविणे या आंदोलनातील मुख्य मागण्या आहेत.

विकास झाडे -नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांची अंमलबजावणी दीड वर्षासाठी स्थगित करणे आणि तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन करणे हा केंद्र सरकारचा प्रस्ताव आंदोलक शेतकऱ्यांनी फेटाळला आहे. शेतकरी नेते दर्शन पाल यांनी सांगितले की, संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत सरकारचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. तीनही कृषी कायदे पूर्णपणे रद्द करणे आणि सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमत देण्यासाठी एक कायदा बनविणे या आंदोलनातील मुख्य मागण्या आहेत. आतापर्यंत १४७ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले. गणतंत्र दिवशी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याचे निश्चित केले आहे. आज दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांना रॅली काढू नका म्हणून समजावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना त्यात यश आले नाही. ही रॅली दिल्लीच्या रिंंग रोेडवर काढली जाणार आहे. दि. २३ रोजी देशभरात राजभवनाला घेराव घालण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला होता. मात्र, हा निर्णय आता रद्द करण्यात आला आहे. आंदोलनात केली शेतकऱ्याने आत्महत्या -टिकरी सीमेवर शेतकरी जय भगवान (४२) यांनी आंदोलनादरम्यान विष घेऊन आत्महत्या केली. रुग्णालयात नेण्यात येत असताना भगवान यांचा मृत्यू झाला. विष खायच्या आधी त्यांनी देशवासियांच्या नावाने पत्र लिहिले. रोहटक जिल्ह्यातील पाकस्मा गावातील शेतकरी जय भगवान दोन-तीन दिवसांपूर्वी आंदोलनात सहभागी व्हायला दिल्लीत आले होते. तेथे त्यांनी कृषी कायदे रद्द न होणे , शेतकरी आणि सरकार दोघेही आपल्या भूमिकांवर अडून बसल्याबद्दल दु:ख व्यक्त केले.

सरकारवर विश्वास ठेवायचा कसा?एका शेतकरी नेत्याने दिलेल्या माहितीनुसार बहुतांश शेतकरी नेते ही सरकारच्चा प्रस्ताव फसवा असून या प्रस्तावाला विरोध करायचा या मताचे आहेत. तर काहींना वाटते सरकारचा प्रस्ताव मान्य करायचा आणि सरकारने तयार केलेल्या समितीच्या माध्यमातून हे कायदे रद्द करण्यासाठी प्रयत्न करायचे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारdelhiदिल्ली