शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Farmers Protest: राकेश टिकैत यांचा सरकारला अल्टीमेटम, 'या' तारखेपर्यंत कृषी कायदे मागे घ्या; अन्यथा...

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 06, 2021 7:58 PM

टिकैत म्हणाले, आम्ही सरकारसोबत कुठल्याही प्रकारच्या दबावात बोलणार नाही. जेव्हा बरोबरचा प्लॅटफॉर्म असेल, तेव्हाच चर्चा होईल. सरकारने आमचे ऐकावे, अन्यथा... (Rakesh tikait)

नवी दिल्ली - केंद्राने केलेल्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास 70 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यातच आता शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh tikait) यांनी केंद्र सरकारला कृषी कायदे मागे घेण्याचा अल्टीमेटम दिला आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, असे टिकैत यांनी म्हटले आहे. ते शनिवारी चक्का जामनंतर दिल्ली-यूपी गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांशी बोलत होते. (Government must repeal farm laws till 2nd october syas Rakesh tikait)

टिकैत म्हणाले, आम्ही सरकारसोबत कुठल्याही प्रकारच्या दबावात बोलणार नाही. जेव्हा बरोबरचा प्लॅटफॉर्म असेल, तेव्हाच चर्चा होईल. आम्ही सरकारला कायदे मागे घेण्यासाठी 2 ऑक्टोबर ही तारीख दिली आहे. यानंतर आम्ही पुढील योजना आखू. सरकारने आमचे ऐकावे, अन्यथा पुढच्या आंदोलनात, ज्यांची मुलं सीमेवर अथवा पोलिसात आहेत, त्यांचे कुटुंबीय येथे असतील. त्यांचे वडिल त्यांचा फोटो घेऊन येथे बसतील. फोट केव्हा घेऊन यायचे हेही मी सांगेन. 

खूशखबर! PM किसान सन्मान स्कीमशी जोडली गेली KCC योजना; 175 लाख अर्ज मंजूर, मिळवा मोठा फायदा

मग म्हणून नका, हे कसे आंदोलन - सरकारने कायदे मागे घ्यावेत, एमएमसपीवर कायदा करावा. अन्यथा हे आंदोलन सुरूच राहील आणि आम्ही देशभर प्रवास करू. आमचे अराजकीय आंदोलन संपूर्ण देशात होईल. मग असे म्हणून नका, की हे कसे आंदोलन आहे, असेही टिकैत म्हणाले.

यांचे देशावर नव्हे व्यापाऱ्यांवर प्रेम -सरकारवर निशाणा साधताना टिकैत म्हणाले, 'आम्ही तिरंग्याला मानतो. आमची मुलं तिरंग्यासाठी मरतात, ते गावातही यातच येतात. तिरंग्याचा अपमान सहन केला जाणार नाही. यांचे देशावर नाही, व्यापाऱ्यांवर प्रेम आहे. शेतकऱ्यांवर यांचे प्रेम नाही, त्यांच्या अन्न धान्यावर प्रेम आहे. यांचे मातीवर नाही अन्नावर प्रेम आहे. हे खिळे पेरतील आम्ही धान्य पेरू.

Delhi violence: 26 जानेवारीच्या हिंसाचाराची स्क्रिप्ट आधीपासूनच तयार होती!; SITच्या चौकशीत मोठा खुलासा 

टिकैत म्हणाले, आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. मात्र, एक अट आहे, की प्लॅटफॉर्म बरोबरीचा असेल, तेव्हाच चर्चा होईल. येथे कुणी ट्रॅक्टर घेऊन आला तर नोटीस पाठवली जात आहे. हा कुठला कायदा आहे. 

आज आंदोलक शेतकऱ्यांनी 3 तासांच्या चक्काजामची घोषणा केली होती. या अंतर्गत दुपारी 12 ते 3 या वेळेत आंदोलक शेतकऱ्यांनी देशात अनेक ठिकाणी महामार्ग जाम केलेहोते.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही: सुब्रमण्यम स्वामी

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरीFarmer strikeशेतकरी संप