शेतकऱ्याचा मृतदेह झेंड्यात गुंडाळला, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 06:31 IST2021-02-06T06:31:43+5:302021-02-06T06:31:50+5:30
शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याचा रस्त्यात अपघाती मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह तिरंग्यात गुंडाळल्याप्रकरणी त्यांची आई, भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतकऱ्याचा मृतदेह झेंड्यात गुंडाळला, गुन्हा दाखल
पिलीभीत : शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेल्या उत्तर प्रदेशातील एका शेतकऱ्याचा रस्त्यात अपघाती मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह तिरंग्यात गुंडाळल्याप्रकरणी त्यांची आई, भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुझिया गावातील बलजिंद्र हा तरुण शेतकरी २३ जानेवारी रोजी आपल्या मित्रांसह शेतकरी आंदोलनात भाग घेण्यासाठी निघाला होता. २५ जानेवारी रोजी त्यांचा अपघातात मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला होता. त्यांचे कुटुंबीय २ फेब्रुवारी रोजी त्यांचा मृतदेह घेऊन आले.