शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

डिझेलचा दर अर्धा करा, कायदे परत घ्या...; शेतकऱ्यांनी सरकारपुढे ठेवल्या 6 मोठ्या मागण्या

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 03, 2020 2:37 PM

यासंदर्भात बोलताना कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी म्हटले आहे, की आज शेतकऱ्यांबरोबर चर्चेची चौथी फेरी आहे. त्यांना आशा आहे, की यातून सकारात्मक मार्ग निघेल.

नवी दिल्ली - कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीला घेऊन शेतकरीकेंद्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. गुरुवारी केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यात पुन्हा एकदा चर्चा होत आहे. याच बरोबर, शेतकऱ्यांनी लेखी स्वरुपात सरकारकडे आपल्या मागण्या केल्या आहेत. त्यावर त्यांना लेखी आश्वासन हवे आहे. गेल्या एक आठवड्यापासून दिल्लीच्या रस्त्यावर सुरू असलेले आंदोलन संपवण्यासाठी सरकार सातत्याने शेतकऱ्यांची समजूत घालत आहे.

अशा आहेत शेतकरी संघटनांच्या मागण्या... -

  • तीनही कृषी कायदे तत्काळ मागे घ्यावेत. 
  • शेतकऱ्यांसाठी MSP कायदा बनवण्यात यावा. 
  • MSP निश्चित करण्यासाठी स्वामीनाथन फॉर्म्यूला लागू करण्यात यावा.
  • NCR रीजनमध्ये हवा प्रदूषण कायद्यातील बदल परत घेण्यात यावेत.
  • शेतीसाठी डिझेलचे दरात 50 टके कमी करावेत.
  • देशभरात शेतकरी नेते, कवी, वकील तथा इतर कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत.

मार्ग निघेल?शेतकरी आणि सरकार यांच्यात आतापर्यंत चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या आहेत. यापूर्वी 1 डिसेंबरला सरकार आणि शेतकरी एका टेबलवर आले होते. मात्र, चर्चा पूर्ण होऊ शकली नव्हती. यामुळे आता सरकारने आपल्या मागण्या लेखी स्वरुपात दिल्या आहेत आणि त्यांना यासंदर्भात पूर्ण हमी हवी आहे. तसेच आजच्या बैठकीत कसल्याही प्रकारचा मार्ग निघाला नाही, तर शेतकरी आंदोलन आणखी तीव्र होईल आणि त्याचा शेवट काय असेल हे कुणालाही माहीत नाही, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

यासंदर्भात बोलताना कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी म्हटले आहे, की आज शेतकऱ्यांबरोबर चर्चेची चौथी फेरी आहे. त्यांना आशा आहे, की यातून सकारात्मक मार्ग निघेल. या चर्चेतून नेमका काय मार्ग निघतो हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

शेतकऱ्यांसोबतच्या चर्चेपूर्वी कृषी मंत्री नरेंद्र तोमर आणि पीयूष गोयल यांनी गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन, त्यांनाही शेतकऱ्यांच्या मागण्याची कल्पना दिली. सरकार शेतकऱ्यांना MSPवर ठोस विश्वास देऊ शकते, असे मानले जात आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपा