शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ऍक्शन मोडमध्ये अमित शहा? 'त्या' पत्रामुळे चर्चेला उधाण; आंदोलक शेतकऱ्यांविरुद्ध मोठ्या कारवाईचे संकेत

By कुणाल गवाणकर | Updated: January 28, 2021 17:56 IST

दिल्ली पोलीस मोठी कारवाई करण्याच्या तयारीत; आयुक्तांचं सहकाऱ्यांना भावुक पत्र

नवी दिल्ली: गेल्या २ महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा काढला. या मोर्चावेळी अनेक ठिकाणी आंदोलक शेतकरी आणि पोलीस आमनेसामने आले. बऱ्याच भागांमध्ये हिंसाचार झाला. आंदोलकांनी लाल किल्ल्यात घुसून धर्मध्वज फडकावला. या हिंसाचारात ३०० हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. यानंतर आता दिल्ली पोलीस मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.

दिल्ली पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना एक पत्र लिहिलं आहे. येणारे दिवस आव्हानात्मक असू शकतात, असं श्रीवास्तव यांनी पत्रात म्हटलं आहे. याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन २६ जानेवारीला घडलेल्या घटनांची संपूर्ण माहिती दिली. दिल्लीत हिंसाचार घडवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असं श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.शेतकरी आंदोलकांचा सामना केलेल्या पोलिसांचं आयुक्तांनी पत्रातून कौतुक केलं आहे. 'तुमच्या मेहनतीमुळे आणि कौशल्यामुळे आपण शेतकरी आंदोलनाच्या आव्हानाचा समर्थपणे सामना करू शकलो. शेतकरी आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचारात आपले ३९४ सहकारी जखमी झाले. यापैकी काहींवर अद्यापही उपचार सुरू आहेत. मी काहींची भेटू घेऊन त्यांची विचारपूस केली आहे,' असं पोलीस आयुक्तांनी सहकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. श्रीवास्तव जखमी पोलिसांची विचारपूस करत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्यासोबत होते. अमित शहा प्रजासत्ताक दिनापासूनच पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांच्या बैठका घेत आहेत.दिल्ली पोलीस ऍक्शन मोडमध्येट्रॅक्टर मोर्चावेळी झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांची धरपकड करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत. अनेक शेतकरी नेत्यांविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. या नेत्यांचे पासपोर्ट जप्त करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. घालून दिलेल्या अटी-शर्तींचं पालन न केल्यानं तुमच्याविरुद्ध कारवाई का करू नये, असा सवाल पोलिसांकडून शेतकरी नेत्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी नेत्यांना ३ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. 

टॅग्स :delhi violenceदिल्लीFarmerशेतकरीAmit Shahअमित शहा