उत्तर प्रदेशातील बागपत येथील रहिवासी असलेल्या फरमान खानने काही दिवसांपूर्वी मोनालिसाशी केरळमधील एका मंदिरात लग्न केलं. मोनालिसा ही तीच मुलगी आहे, जी २०२५ च्या महाकुंभमध्ये रुद्राक्ष विकताना प्रसिद्ध झाली होती. तिने अलीकडेच 'द डायरी ऑफ मणिपूर' या चित्रपटातही काम केलं आहे. या दोघांच्या लग्नानंतर त्यांचे कुटुंबीय प्रचंड नाराज आहेत. फरमान खानचे वडील जाफर अली यांनी मुलाशी सर्व संबंध, नातं तोडलं असून, आता आमच्यात कोणतंही बोलणं होत नाही, असं स्पष्ट केलं आहे.
फरमानच्या गावाचं नाव पलडी आहे. जेव्हा त्यांच्या लग्नाची बातमी आली, तेव्हाच वडील जाफर अली यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या मते, पूर्वी दर महिन्याला फरमानशी फोनवर बोलणं व्हायचं आणि तो वर्षातून किंवा सहा महिन्यातून एकदा गावी येत असे. मात्र आता तो आमच्याशी बोलत नाही आणि कुटुंबातील लोकही त्याला फोन करत नाहीत. त्याच्याशी नातं तोडण्यासाठी लवकरच कायदेशीर कागदपत्रं तयार करू असंही त्यांनी सांगितलं.
"फरमान गुन्हेगार, साधू बनून भेटला आणि मोनालिसाला फसवलं"; सनोज मिश्रांचा धक्कादायक दावा
या लग्नामुळे मध्य प्रदेशात राहणाऱ्या मोनालिसाच्या घरच्यांनाही मोठा धक्का बसला आहे. लग्नाची माहिती मिळताच तिचे वडील तातडीने विमानाने केरळला पोहोचले, पण त्यांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. लग्नादरम्यान मोनालिसाने पोलीस सुरक्षेची मागणी केली होती. तिच्या घरचे तिला मारण्याची धमकी देत आहेत, असा आरोप मोनालिसाने केला होता.
"मला १० वेळा चुकीचा स्पर्श केला, अत्यंत घाणेरडा माणूस"; मोनालिसाचा सनोज मिश्रांवर गंभीर आरोप
जाफर अली यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, मुलाने हिंदू मुलीशी लग्न करून समाजासमोर आमचं नाक कापलं आहे. जर त्याने आम्हाला सांगितलं असतं, तर आम्ही आमच्या समाजातील मुलीशी त्याचं लग्न लावून दिलं असतं. त्याने आम्हाला न सांगता हे लग्न केलं असून, आम्हाला इतरांकडून ही माहिती मिळाली. आम्ही मोनालिसाला कधीही आमची सून म्हणून स्वीकारणार नाही.
"मी काहीतरी खाऊन मरून जाईन"; मोनालिसाच्या आईचा टाहो, हात जोडून केली 'ही' विनंती
"मोनालिसा अल्पवयीन, २००९ मध्ये जन्म, मुद्दाम वाढवलं वय..."; काकांचा खळबळजनक खुलासा
फरमान खान आणि मोनालिसा यांची भेट मुंबईतील एका स्टुडिओमध्ये झाली होती. त्यानंतर ते अनेकदा चित्रपटाच्या सेटवरही भेटले. सहा महिने एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी केरळमध्ये लग्न केल्याचं म्हटलं जात आहे. मोनालिसानेच आपल्याला प्रपोज केलं होतं, असं फरमानने सांगितलं. सध्या मोनालिसा आणि फरमानच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
Web Summary : Farman married Monalisa in Kerala, causing family outrage. His father disowned him, disapproving of the interfaith union. Monalisa's family also opposed the marriage, alleging threats. The couple met in Mumbai and faced familial rejection.
Web Summary : फरमान ने केरल में मोनालिसा से शादी की, जिससे परिवार नाराज है। पिता ने अंतरधार्मिक विवाह अस्वीकार करते हुए उसे बेदखल कर दिया। मोनालिसा के परिवार ने भी शादी का विरोध किया, धमकियों का आरोप लगाया। दंपति मुंबई में मिले और पारिवारिक अस्वीकृति का सामना किया।