शेतातील अड्डा आणि ड्रग्सचा धंदा, प्रसिद्ध गायिका करायची तस्करी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 14:00 IST2026-02-11T13:58:45+5:302026-02-11T14:00:50+5:30

Punjab Crime News: पंजाब पोलिसांना ऑपरेशन प्रहार-२ दरम्यान, मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी प्रसिद्ध पंजाबी गायिका परमजित कौर पम्मी आणि तिचा भाई सरवन सिंह मिर्झा यांना माछीवाडा साहीब क्षेत्रामधून हेरॉइनसह अटक केली आहे.

Farm den and drug business, famous Punjabi singer wanted for smuggling, police arrest him | शेतातील अड्डा आणि ड्रग्सचा धंदा, प्रसिद्ध गायिका करायची तस्करी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या  

शेतातील अड्डा आणि ड्रग्सचा धंदा, प्रसिद्ध गायिका करायची तस्करी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या  

गेल्या काही दिवसांपासून पंजाब पोलिसांनी अंमली पदार्थांच्या व्यवसायाविरोधात धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान पोलिसांना ऑपरेशन प्रहार-२ दरम्यान, मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी प्रसिद्ध पंजाबी गायिका परमजित कौर पम्मी आणि तिचा भाई सरवन सिंह मिर्झा यांना माछीवाडा साहीब क्षेत्रामधून हेरॉइनसह अटक केली आहे.

पंजाब सरकारने दिलेल्या आदेशांनुसार डीजीपी आणि डीआयजी लुधियाना रेंज यांच्या देखरेखीखाली खन्ना पोलिसांनी अंमली पदार्थांच्या व्यापाराविरोधात ऑपरेशन प्रहार-२ सुरू केलं आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणारे तस्कर आणि त्यांच्या  सहकाऱ्यांवर एकाच वेळी कारवाई करणे हा या मोहिमेचा हेतू होता. खन्ना पोलिसांनी हेल्पलाईन इनपूट, स्थानिक गुप्तचरांकडून मिळालेली माहिती आणि सर्व्हिलान्सच्या आधारावर संवेदनशील परिसरांची यादी तयार केली. तसेच पहिल्याच दिवशी १२५ हून अधिक समाजकंटकांच्या मुसक्या आवळल्या.

याचदरम्यान, परमजीत कौर पम्मी आणि तिचा भाऊ शेतांमध्ये अड्डा उभारून संशयास्पद व्यवसाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही जागा सर्वसामान्यांच्या नजरेपासून दूर होती. तसेच तिथे मोजक्या लोकांचीच ये जा सुरू होती. तसेच तिथूनच अंमली पदार्थांच्या पुरवठ्याचं काम केलं जात असे. याबाबत स्थानिकांकडून अनेकदा तक्रारी करण्यात येत होत्या. मात्र पोलिसांकडून सबळ माहिती आणि योग्य वेळेची वाट पाहिली जात होती. अखेरीस सबळ पुरावे आणि माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने छापा मारला आणि पंजाबी गायिका परमजित कौर पम्मी आणि तिचा भाई सरवन सिंह मिर्झा यांना अटक केली. त्यांच्याकडून आठ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आलं.  

Web Title : पंजाबी गायिका खेत में ड्रग्स तस्करी करते गिरफ्तार।

Web Summary : पंजाब पुलिस ने पंजाबी गायिका परमजीत कौर पम्मी और उसके भाई को ड्रग्स तस्करी के आरोप में गिरफ्तार किया। वे खेत में छिपकर नशीले पदार्थों की आपूर्ति करते थे। पुलिस ने शिकायतें मिलने और ऑपरेशन प्रहार-2 के दौरान सबूत जुटाने के बाद आठ ग्राम हेरोइन जब्त की।

Web Title : Punjabi singer arrested for drug trafficking from farm hideout.

Web Summary : Punjab police arrested Punjabi singer Paramjit Kaur Pammi and her brother for drug trafficking. They operated from a hidden farm location, supplying narcotics. Police seized eight grams of heroin after receiving complaints and gathering evidence during Operation Prahar-2.