प्रसिद्ध शायर राहत इंदौरी कोरोना पॉझिटीव्ह, चाहत्यांना केलं महत्त्वाचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 09:00 AM2020-08-11T09:00:24+5:302020-08-11T09:01:19+5:30

राहत इंदोरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन चाहत्यांना माहिती देताना म्हटले की, मला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे टेस्ट केली. त्यामध्ये माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

Famous shire rahat indori corona positive, important appeal to fans by twitter | प्रसिद्ध शायर राहत इंदौरी कोरोना पॉझिटीव्ह, चाहत्यांना केलं महत्त्वाचं आवाहन

प्रसिद्ध शायर राहत इंदौरी कोरोना पॉझिटीव्ह, चाहत्यांना केलं महत्त्वाचं आवाहन

googlenewsNext
ठळक मुद्देराहत यांच्या कोरोना अहवालाची माहिती मिळताच, त्यांच्या चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली आहे. तर, मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनीही त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. 

इंदौर - कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वोतोरी प्रयत्न करत आहे. मात्र, देशात अनलॉकची घोषणा केल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती, तर अनेक दिग्गजांनाही या रोगाचा सामना करावा लागला आहे. आता, प्रसिद्ध हिंदी आणि उर्दू शायर व गीतकार राहत इंदौरी यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वत:च याबद्दल सोशल मीडियातून माहिती दिली आहे.  


राहत इंदोरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन चाहत्यांना माहिती देताना म्हटले की, मला कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे टेस्ट केली. त्यामध्ये माझी कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे मी ऑरबिंदो हॉस्पीटल येथे उपचारासाठी दाखल झालो आहे. मी फेसबुक आणि ट्विटरवरुन आपणास माझ्या प्रकृतीची माहिती देतच राहिल. आपल्या प्रार्थनांची गरज आहे. कृपया, कुणीही मला किंवा कुटुंबीयांना फोन करु नये, असे आवाहनही राहत इंदौरी यांनी केले आहे. 

राहत यांच्या कोरोना अहवालाची माहिती मिळताच, त्यांच्या चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केली आहे. तर, मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनीही त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. 

दरम्यान, इंदौरमध्ये, आरोग्य विभागाची टीम येथील टाटपट्टी बाखलमध्ये काही महिलांची तपासणी करण्यासाठी पोहोचली असता, या टीमवर स्थानिक लोकांनी दगडफेक केल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर शायर राहत इंदोरी यांनी ट्विटवरुन एक व्हिडीओ अपलोड करत नागरिकांनी आवाहन केलं होते. डॉक्टर, पोलीस हे सर्व आपले मदतगार आहेत. जर, आपण त्यांची मदत केली, तरच उद्या वेळ आपल्या मदतीला येईल, असे भावूक आवाहन डॉ. राहत इंदोरी यांनी केलं होतं. तर, कोरोनाबाबत मोठ्या प्रमाणात जागृती करण्याचं कामही ते आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन करत आहेत.   
 

Read in English

Web Title: Famous shire rahat indori corona positive, important appeal to fans by twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.