भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 17:59 IST2025-11-22T17:58:48+5:302025-11-22T17:59:37+5:30
Harman Sidhu News: पंजाबी मनोरंजन जगतामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक हरमन सिद्धू याचा एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. हरमन सिद्धू हा केवळ ३७ वर्षांचा होता. हरमन सिद्धू याने अनेक प्रसिद्ध गाण्यांना आपला आवाज दिला होते.

भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
पंजाबी मनोरंजन जगतामधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक हरमन सिद्धू याचा एका भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. हरमन सिद्धू हा केवळ ३७ वर्षांचा होता. हरमन सिद्धू याने अनेक प्रसिद्ध गाण्यांना आपला आवाज दिला होते.
दरम्यान, प्रसिद्ध पंजाबी गायक हरमन सिद्धू याच्या मृत्यूचं वृत्त ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हरमन सिद्धू हा पंजाबी संगीत जगतातील एक उत्तम आणि गुणवान कलाकार होता. एका भीषण अपघातामुळे त्याची या जगातून अकाली एक्झिट झाली आहे.