प्रसिद्ध अभिनेत्री गायत्री हिचा भीषण अपघातात मृत्यू, वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 04:29 PM2022-03-21T16:29:20+5:302022-03-21T17:30:45+5:30

Accident News: दक्षिणेतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. गायत्री ऊर्फ डॉली डी क्रूझ असे तिचे नाव असून, ती २६ वर्षांची होती. तिच्या अकाली मृत्यूमुळे चाहत्यांमध्ये दु:खाचे वातावरण आहे.

Famous actress Gayatri died in a horrific accident at the tender age of 26 | प्रसिद्ध अभिनेत्री गायत्री हिचा भीषण अपघातात मृत्यू, वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप 

प्रसिद्ध अभिनेत्री गायत्री हिचा भीषण अपघातात मृत्यू, वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप 

googlenewsNext

हैदराबाद - दक्षिणेतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. गायत्री ऊर्फ डॉली डी क्रूझ असे तिचे नाव असून, ती २६ वर्षांची होती. तिच्या अकाली मृत्यूमुळे चाहत्यांमध्ये दु:खाचे वातावरण आहे. ही अभिनेत्री तिच्या मित्रासोहत घरी जात असताना हा भीषण अपघात झाला.

गायत्री ऊर्फ डॉली डी क्रूझ ही ज्या कारमधून प्रवास करत होती. त्या कारला हैदराबादमधील गाचीबोवली परिसरामध्ये भीषण अपघात झाला. अपघात झाला तेव्हा गायत्री तिच्या मित्रासोबत घरी येत होती. शुक्रवारी रात्री होळी साजरी केल्यानंतर ते मागे फिरत होते. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात गायत्रीचा  मित्र राठोड याचाही मृत्यू झाला. कार रस्त्यावरील दुभाजकाला आदळून अनियंत्रित झाली आणि उलटली. त्यामुळे हा अपघात झाला.

हा अपघात इतका भीषण होता की, त्यामुळे गायत्रीचा घटनास्थळी मृत्यू झाला तर तिचा मित्र राठोड याला गंभीर दुखापत झाली. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचे प्राण वाचू शकली नाही. या अपघातादरम्यान या कारने अजून एका महिलेला धडक दिली होती. तिचाही या अपघातात मृत्यू झाला.

गायत्री उर्फ डॉली डी क्रूझ हिने सुरुवातीला इन्स्टाग्राम पोस्ट आणि युट्युब चॅनेलच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवली होती. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळाल्यानंतर तिला एका वेबसिरीजसाठी ऑफर मिळाली होती. तसेच तिने अनेक शॉर्टफिल्ममध्येही काम केले होते.  

Web Title: Famous actress Gayatri died in a horrific accident at the tender age of 26

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.