जयपूरमध्ये ‘स्पेशल २६’! तोतया अधिकाऱ्यांचा छापा; २३ लाख घेऊन झाले पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 02:01 PM2021-03-27T14:01:03+5:302021-03-27T14:02:40+5:30

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून काही जणांनी छापेमारीचा बनाव केल्याची घटना घडली आहे.

fake acb officers raid in jaipur and looted 23 lakh rupees | जयपूरमध्ये ‘स्पेशल २६’! तोतया अधिकाऱ्यांचा छापा; २३ लाख घेऊन झाले पसार

जयपूरमध्ये ‘स्पेशल २६’! तोतया अधिकाऱ्यांचा छापा; २३ लाख घेऊन झाले पसार

Next
ठळक मुद्देजयपूरमध्ये छापेमारीचा बनाव२३ लाख रुपये लुटून पसारपोलिसांकडून अधिक तपास सुरू

जयपूर :राजस्थानमधील जयपूर येथे एक वेगळाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अगदी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना घडली आहे. ही घटना पाहिल्यावर काही वर्षांपूर्वी आलेल्या स्पेशल २६ चित्रपट आठवतो. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून काही जणांनी छापेमारी केली आणि त्या ठिकाणातून तब्बल २३ लाख रुपयांची रोकड घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (fake acb officers raid in jaipur and looted 23 lakh rupees)

मिळालेल्या माहितीनुसार, जवाहर नगर येथील सेक्टर सात येथे ही घटना घडली. दीपक शर्मा असे या पीडित कुटुंबाचे नाव आहे. ही घटना घडली, तेव्हा दीपक शर्मा यांचा मुलगा विनीत एकटाच घरी होता. काही जण लाचलुचपत विभागातून आल्याचे सांगत दीपक शर्मा यांच्या घरात घुसले. या तोतया अधिकाऱ्यांनी शर्मा यांच्या घराची झाडाझडती केली. या दरम्यान त्यांना २३ लाख रुपये मिळाले, ते घेऊन तोतया अधिकाऱ्यांनी पळ काढला, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

‘त्या’ वक्तव्यावरुन शशी थरूर यांनी मागितली पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी

लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचा बनाव करत काही जणांनी शर्मा यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी विनीत शर्मा एकटाच घरी असल्याचे तो घाबरला. भीतीपोटी २३ लाख रुपये घरात असल्याचे विनीतने त्या तोतया अधिकाऱ्यांना सांगितले. घरातील तब्बल २३ लाख रुपये घेऊन तोतया अधिकारी पसार झाले. यानंतर विनीत यांना संशय आला. त्यामुळे या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. 

‘‘भारतीय जनतेचा बांगलादेश निर्मितीला पाठिंबा होता, तर मोदींनी सत्याग्रह का केला?’’

शर्मा यांच्या घरी बनावट छापेमारी केलेल्यांनी दोन हार्डडिस्कही आपल्यासोबत नेल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दखल घेत पुढील तपासाला सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन लवकरच या बनाव रचणाऱ्या तोतयांना गजाआड केले जाईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. 

Web Title: fake acb officers raid in jaipur and looted 23 lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.