मध्यपूर्वेतील इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्ध आता एका अत्यंत भीषण वळणावर पोहोचले आहे. या संघर्षाच्या आगीत आता 'फेक न्यूज'चे रॉकेल ओतण्याचे काम सुरू झाले असून, भारताला विनाकारण या वादात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. अमेरिकेचे माजी कर्नल डगलस मॅकग्रेगर यांनी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत, "अमेरिकाइराणवर हल्ले करण्यासाठी भारतीय बंदरांचा वापर करत आहे," असा खळबळजनक दावा केला होता. मात्र, भारत सरकारने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावत हा 'प्रोपोगंडा' असल्याचे स्पष्ट केले आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नेमका दावा काय होता?
अमेरिकन चॅनल 'वन अमेरिका न्यूज'शी बोलताना डगलस मॅकग्रेगर यांनी म्हटले होते की, इराणच्या हल्ल्यात मध्यपूर्वेतील अमेरिकेचे सर्व लष्करी तळ उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे आता इराणला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकन नौदलाला भारतीय बंदरांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागत आहे. या विधानामुळे जागतिक स्तरावर भारताच्या तटस्थ भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
भारत सरकारने काय म्हटले?
परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत 'फॅक्ट चेक' हँडलवरून या संदर्भात कडक शब्दांत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले की, "फेक न्यूजपासून सावध राहा! अमेरिकन चॅनलवर केले जाणारे हे दावे पूर्णपणे खोटे, निराधार आणि मनमानी आहेत. भारताने कधीही आपल्या भूमीवर परदेशी सैन्याला तळ ठोकण्याची परवानगी दिलेली नाही आणि आमचे धोरण आजही स्पष्ट आहे."
इराणमध्ये रक्ताचा सडा; अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू?
दरम्यान, इराणमध्ये सुरू असलेले युद्ध अधिक हिंसक झाले आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. अमेरिकेचे युद्ध सचिव पीट हेगसेथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ऑपरेशन एपिक फ्यूरी' अंतर्गत अमेरिकेने इराणच्या लष्करी ताकदीला मोठी खीळ घातली आहे. अवघ्या चार दिवसांत अमेरिकेने इराणमधील २,००० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले असून, इराणचा क्षेपणास्त्र मारा ८६ टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा पेंटागॉनने केला आहे.
Web Summary : Reports falsely claim US uses Indian ports to attack Iran. India denies these baseless allegations, reaffirming its neutral stance and barring foreign military bases on its soil. Tensions escalate following claims of Ayatollah Khamenei's death and US strikes on Iranian targets.
Web Summary : रिपोर्ट्स में झूठा दावा किया गया है कि अमेरिका ईरान पर हमला करने के लिए भारतीय बंदरगाहों का उपयोग करता है। भारत ने इन निराधार आरोपों का खंडन किया है, अपनी तटस्थ स्थिति की पुष्टि की है और अपनी धरती पर विदेशी सैन्य अड्डों पर रोक लगाई है। अयातुल्ला खमेनी की मौत और ईरान पर अमेरिकी हमलों के बाद तनाव बढ़ गया है।