पत्नीनं नपुंसक म्हणत तलाक मागितला; पतीनं दुसऱ्या महिलेसोबतचा 'तसा' व्हिडीओच पाठवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 12:56 IST2018-07-31T12:54:14+5:302018-07-31T12:56:50+5:30

पोलिसांकडून पतीची तुरुंगात रवानगी

facing divorce in ground of impotence Hyderabad man shoots porn video sends to his wife | पत्नीनं नपुंसक म्हणत तलाक मागितला; पतीनं दुसऱ्या महिलेसोबतचा 'तसा' व्हिडीओच पाठवला!

पत्नीनं नपुंसक म्हणत तलाक मागितला; पतीनं दुसऱ्या महिलेसोबतचा 'तसा' व्हिडीओच पाठवला!

चेन्नई: पती नपुंसक असल्याचं म्हणत चेन्नईतील एका महिलेनं तलाकची मागणी केली आहे. यानंतर आपल्या पौरुषत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानं पतीनं दुसऱ्या एक महिलेसोबत शारीरिक संबंधांचा व्हिडीओ पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांना पाठवला. पत्नीला धडा शिकवण्यासाठी पतीनं हे पाऊल उचललं. मात्र त्या नादात पतीची रवानगी तुरुंगात झाली. 

हैदराबादमधील बहादूर नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या विबावसूचा विवाह मुतामिज नगरमध्ये राहणाऱ्या अनुषा सोबत झाला. 2016 मध्ये हे दोघे विवाह बंधनात अडकले. लग्नानंतर हे दाम्पत्य 15 दिवस एकत्र राहिल्याची माहिती ऑल वूमन पोलीसमध्ये निरीक्षक असलेल्या डी. चित्रा यांनी दिली. या काळात दोघांमध्ये वाद झाले आणि अनुषा तिच्या आई-वडिलांकडे राहायला गेली. विबावसू आणि अनुषा यांनी एकत्र यावं यासाठी दोन्ही कुटुंबानी खूप प्रयत्न केले. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही.

यानंतर अनुषानं कौटुंबिक न्यायालयात तलाकसाठी अर्ज दाखल केला. तिनं तलाकसाठी विबावसू नपुंसक असल्याचं कारण दिलं. याची माहिती मिळताच विबावसू संतापला. त्यानं पत्नीचे आरोप खोटे ठरवण्यासाठी दुसऱ्या महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानं या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ शूट केला. यावेळी विबावसू आणि त्या महिलेसोबत खोलीत आणखी एक व्यक्ती उपस्थित होती. त्या व्यक्तीनेच या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ शूट केला. विबावसूनं हा 5 मिनिटांचा व्हिडीओ चेन्नईत राहणाऱ्या अनुषा, तिचे वडील आणि तिच्या काकीला पाठवला. यानंतर अनुषाच्या कुटुंबीयांनी विबावसूविरोधात एफआयआर दाखल केला. विबावसूनं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यासह अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. 
 

Web Title: facing divorce in ground of impotence Hyderabad man shoots porn video sends to his wife