शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

''काश्मीरमध्ये सगळंच सुरळीत आहे, मग 9 लाख जवान तैनात कशासाठी?''

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 18:03 IST

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विटरवरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

श्रीनगरः जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी ट्विटरवरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. एकानंतर एक ट्विट करून मेहबुबा मुफ्तींनी भाजपावर टीका केली आहे. जर काश्मीरमध्ये सर्वच परिस्थिती सामान्य आहे, मग मोदी सरकारनं 9 लाख जवान कशासाठी तैनात केले आहेत. पुढे मेहबुबा मुफ्तींनी सांगितलं की, पाकिस्तानकडून होणाऱ्या आगळिकीला उत्तर देण्यासाठी जवान तैनात केलेले नाहीत, विरोध प्रदर्शन करणाऱ्या लोकांना रोखण्याचं काम हे जवान करत आहेत.लष्कराची प्राथमिक जबाबदारी ही नियंत्रण रेषेची सुरक्षा करण्याची आहे. आंदोलकांना चिरडण्याचं काम सेनेनं केलेलं नाही. पीडीपी प्रमुखांनाही या दिवसांमध्ये नजरकैद करण्यात आलं आहे. त्यांची मुलगी इल्तिजा ट्विटर अकाऊंटवर सक्रिय आहे. भाजपा मतं मिळवण्यासाठी जवानांचा उपयोग करतंय. काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी जवानांचा वार केला जात आहे. सत्ताधाऱ्यांना जवान आणि काश्मिरींची चिंता नाही. त्यांची एकमात्र चिंता निवडणूक जिंकणं ही आहे. तसेच मेहबुबा मुफ्तींनी तीन काश्मिरी नेत्यांना केलेल्या नजरकैदेवरूनही सरकारला धारेवर धरलं आहे. मात्र व्यक्ती स्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्य यांसारखे मूलभूत अधिकारही काश्मिरी लोकांना का नाकारले जात आहेत हे समजत नाही. सध्या काश्मिरींना इतर भारतीयांप्रमाणे हक्क दिले जात असल्याचे सरकार सांगत आहे, पण सत्य परिस्थिती वेगळी आहे. येथील काश्मिरी लोकांचे मूलभूत अधिकारही काढून घेण्यात आले आहेत,' असं ट्विट मेहबुबा मुफ्ती यांनी केलं आहे. मेहबुबा मुफ्ती यांनी वृक्षतोडीचा निषेध नोंदविला होता. तसेच मेहबुबा मुफ्ती यांनीही आंदोलकांचे समर्थन करताना वृक्षतोडीविरोधात आवाज उठविण्याचे आवाहन केले होते. 

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती