शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

निर्मला सीतारामनांनी केलं रॉबर्ट वाड्रांचं नामकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2019 4:44 PM

राहुल गांधींच्या 'AA'ला सीतारामन यांचं 'RV'नं प्रत्युत्तर

नवी दिल्ली: प्रत्येक 'AA'साठी 'RV' आहे, असं म्हणत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. काँग्रेसनंराफेल डीलवरुन केलेल्या आरोपांना सीतारामन यांनी आज लोकसभेत उत्तर दिलं. त्यावेळी त्यांनी कोणाचंही नाव न घेता, फक्त आद्याक्षरांचा वापर करत राहुल गांधींवर निशाणा साधला. 'प्रत्येक 'AA' साठी 'RV' नव्हेच तर 'Q' देखील आहे. विनोद करण्यासाठी आद्याक्षरांचा वापर करणं सोपं आहे. मात्र ही दुधारी तलवार आहे. त्यानं तुमच्यावरदेखील वार होऊ शकतो,' असा शब्दांमध्ये सीतारामन यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. 'RV' हे पंतप्रधानांचे जावई नव्हते, तर संपूर्ण देशाचे जावई होते, असा टोलादेखील त्यांनी लगावला. सीतारामन यांनी रॉबर्ट वाड्रांच्या नावांच्या आद्याक्षरांचा वापर करत काँग्रेसला लक्ष्य केलं. रॉबर्ट वाड्रा हे सोनिया गांधींचे जावई आहेत. गुरुग्राममधील अनेक वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचे आरोप भाजपाकडून करण्यात आले आहेत. बुधवारी संसदेत राफेल डीलवर बोलताना राहुल गांधींनी मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. त्यावेळी राहुल यांनी राफेल डीलमधील उद्योगपती अनिल अंबानी यांच्या नावाचा उल्लेख केला. मात्र सभागृहाचे सदस्य नसलेल्या व्यक्तींचं नाव सदनात घेता येत नाही, या नियमाची आठवण लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी त्यांना करुन दिली. यानंतर राहुल यांनी अनिल अंबानी यांच्या नावाचं आणि आडनावाचं आद्याक्षर वापरलं आणि 'AA' असा उल्लेख करत राफेल डीलवरुन सरकारला लक्ष्य केलं. 

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनrobert vadraरॉबर्ट वाड्राRafale Dealराफेल डीलBJPभाजपाcongressकाँग्रेस