नवी दिल्ली - अमेरिकेत जाहीर झालेल्या ‘एपस्टिन फाइल्स’मध्ये केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू खात्याचे मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे नाव आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लोकसभेत शुक्रवारी गदारोळ केला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत स्थगित करावे लागले. त्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी संसद भवन परिसरात निदर्शने केली.
लोकसभेचे कामकाज सकाळी सुरू होताच विरोधी सदस्यांनी पुरी यांच्या निषेधाचे फलक हातात घेऊन सभागृहात गदारोळ माजविला. जेफ्री एपस्टिनला मी काही प्रसंगी भेटलो होते; पण एपस्टिनने जे लैंगिक गुन्हे केले, त्यांच्याशी या भेटींचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणतीही ठोस माहिती नसताना राहुल गांधी माझ्यावर टीका करत आहेत, असेही पुरी यांनी बुधवारी सांगितले होते.
लोकसभेचे सभागृह दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केल्यानंतर काँग्रेस खासदारांनी संसद भवन परिसरात निदर्शने करताना हातात हरदीपसिंग पुरी व जेफ्री एपस्टिन यांची छायाचित्रे असलेला मोठा फलक हातात धरला होता. तसेच लोकसभेत विरोधकांनी भारत-अमेरिका अंतरिम व्यापारी कराराविरोधातही घोषणा दिल्या.
संसदेचे कामकाज ९ मार्चला पुन्हा सुरू होणारभारत-अमेरिका अंतरिम व्यापार करार आणि माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील उल्लेखांवरून सत्ताधारी, विरोधकांमध्ये झालेल्या जोरदार संघर्षामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा शुक्रवारी संपला आहे. आता लोकसभा, राज्यसभेचे कामकाज येत्या ९ मार्चपासून पुन्हा सुरू होणार आहे. लोकसभेत कामकाज चालविताना अध्यक्ष ओम बिर्ला पक्षपाती भूमिका घेतात असा दावा करत विरोधी पक्षांनी त्यांना अध्यक्षपदावरून दूर करण्याकरिता अविश्वास प्रस्ताव मांडण्यासाठी नोटीस दिली. हा प्रस्ताव अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात ९ मार्च रोजी मांडला जाण्याची शक्यता आहे.
शेतकरी संघटनांच्या नेत्यांशी राहुल गांधींची चर्चालोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी संसद भवन परिसरात विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. अमेरिकेशी संभाव्य व्यापार करारावर या बैठकीत चर्चा झाली असून, याविरोधात देशव्यापी आंदोलन छेडण्याची शक्यता आहे. या बैठकीला भारतीय शेतकरी मजूर युनियनचे नेते सुखपाल सिंह खैरा, ॲड. अशोक बलहारा, भारतीय शेतकरी युनियन (क्रांतीकारी) चे नेते बलदेव सिंह जीरा, पुरोगामी शेतकरी फ्रंटचे के. आर. नंदकुमार, भारतीय शेतकरी युनियन (शहीद भगत सिंग)चे नेते अमरजीत एस. मोहरी आदी नेते उपस्थित होते.
Web Summary : Opposition protests in Parliament demanded Minister Puri's resignation over alleged Epstein links, disrupting proceedings. Congress protested outside. Parliament adjourned for recess after uproar over trade deal, General Naravane book. Farmer leaders met Rahul Gandhi to discuss trade deal concerns.
Web Summary : एपस्टीन से कथित संबंधों को लेकर संसद में विपक्ष का हंगामा, मंत्री पुरी के इस्तीफे की मांग। कांग्रेस का बाहर विरोध प्रदर्शन। व्यापार समझौते, जनरल नरवणे की किताब पर हंगामे के बाद संसद स्थगित। किसान नेताओं ने राहुल गांधी से मुलाकात की।