संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 10:39 IST2025-05-20T10:39:02+5:302025-05-20T10:39:56+5:30
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ६-७ मे च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर लॉन्च करत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला

संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
नवी दिल्ली - भारताजवळपाकिस्तानात आत घुसून अचूक हल्ला करण्याची ताकद आहे. मग ते रावलपिंडी असो वा खैबर पख्तूनख्वा अथवा कुठलाही भाग असेल अशा शब्दात भारतीय वायू सेनेचे महासंचालक लेफ्टिनंट जनरल सुमेर इवान डी कुन्हा यांनी सैन्याच्या क्षमतेवर भाष्य केले आहे. पूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये आहे जर पाकिस्तानी सैन्याने त्यांचे मुख्यालय रावलपिंडीहून केपीकेला शिफ्ट केले तरीही त्यांना लपायला जागा शोधावी लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने काय केले?
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ६-७ मे च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर लॉन्च करत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला. या काळात सैन्याने लोइटरिंग म्यूनिशन, लॉन्ग रेंज ड्रोन आणि गाइडेड शस्त्रांचा प्रभावी वापर केला. लश्कर आणि जैशचे मुख्यालय, घुसखोरांच्या चौक्या, कंट्रोल रूम नष्ट केले. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. ज्यातील काही प्रमुख दहशतवादी भारताच्या हल्ल्यात समाविष्ट होते.
भारतीय सैन्याची रणनीती
भारताच्या सैन्याने आपला विचार बदलला आहे. आता आम्ही सहन करत नाही तर उलट अचूक वेळी योग्य ठिकाणी प्रत्युत्तर देण्याचे धोरण अवलंबतो. जोपर्यंत सीमा पार होत नाही तोपर्यंत आम्ही सहन करतो, परंतु रेषा पार केली तर आम्ही निर्णायक कार्यवाही करतो. या रणनीतीत भारताने जगालाही संदेश दिला आहे. आता यापुढे दहशतवादाविरोधात बचावात्मक नाही तर आक्रमक पवित्रा घेतला जाणार आहे असं लेफ्टिनंट जनरल डी कुन्हा यांनी सांगितले.
#WATCH | Delhi: DG Army Air Defence Lt Gen Sumer Ivan D’Cunha says, "India has an adequate arsenal of weapons to take on Pakistan right across its depth. So, from its broadest to its narrowest, wherever it is, the whole of Pakistan is within range... The GHQ (General… pic.twitter.com/U8jFcmIC8Y
— ANI (@ANI) May 19, 2025
आत्मनिर्भर सैन्य तंत्रज्ञान
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने स्वदेशी तंत्रज्ञान आणि सैन्य तुकड्यांमध्ये समन्वय साधला. भारतीय सैन्याने ड्रोन डिटेक्शन आणि इंटरसेप्शन सिस्टमने शत्रूचे हल्ले परतावून लावले. लॉन्ग रेंज मिसाईलने दहशतवादी तळांना कुठल्याही नागरी ढाच्याचा नुकसान न पोहचवता यूनिफाइड कमान संरचनेतंर्गत वायूसेना, लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांनी एकत्रित काम केले. आम्ही केवळ सीमेचे रक्षण केले नाही तर छावण्या, नागरीक क्षेत्र आणि आमच्या जवानांच्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवले. हाच आमचा विजय आहे असं लेफ्टिनंट जनरल डी कुन्हा यांनी म्हटलं.