'मेडिकल ऑक्सिजनचा बफर स्टॉक ठेवावा', कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्राकडून सर्व राज्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 01:29 PM2022-01-12T13:29:21+5:302022-01-12T13:29:59+5:30

Medical Oxygen : सर्व राज्यांनी मेडिकल ऑक्सिजनचा पुरेसा बफर स्टॉक ठेवावा, अशा सूचना केंद्राने राज्यांना मेडिकल ऑक्सिजनबाबत दिल्या आहेत.

Ensure adequate buffer stock of medical oxygen: Centre to states | 'मेडिकल ऑक्सिजनचा बफर स्टॉक ठेवावा', कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्राकडून सर्व राज्यांना निर्देश

'मेडिकल ऑक्सिजनचा बफर स्टॉक ठेवावा', कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता केंद्राकडून सर्व राज्यांना निर्देश

Next

नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोना (Covid-19) पाहता बुधवारी केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहिले. यामध्ये राज्य सरकारांनी मेडिकल ऑक्सिजन वेळेवर पुरविण्यासाठी सर्व तयारी करावी, असे म्हटले आहे.

ऑक्सिजनचा पुरेसा बफर स्टॉक ठेवण्याचे निर्देश
सर्व राज्यांनी मेडिकल ऑक्सिजनचा पुरेसा बफर स्टॉक ठेवावा, अशा सूचना केंद्राने राज्यांना मेडिकल ऑक्सिजनबाबत दिल्या आहेत. याशिवाय, रुग्णांच्या काळजीसाठी सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे म्हटले आहे.

48 तासांसाठी ऑक्सिजनचा स्टॉक आवश्यक 
केंद्रीय आरोग्य सचिवांनी सांगितले आहे की, राज्य सरकारांनी ऑक्सिजन थेरपीमध्ये किमान 48 तास पुरेसा मेडिकल ऑक्सिजनचा बफर स्टॉक ठेवावा. त्यामध्ये लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची (LMO) उपलब्धता सुनिश्चित करा. याशिवाय, आरोग्य सुविधांसाठी असलेल्या एलएमओ टाक्या पुरेशा प्रमाणात भरल्या गेल्या पाहिजेत आणि त्यांच्या रिफिलसाठी अखंड पुरवठा असावा.

ऑक्सिजन सिलिंडरची यादी तयार करावी
याशिवाय, पीएसए प्लांट पूर्णपणे कार्यरत आहेत का?  हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे आणि योग्य देखभालीसाठी सर्व पावले उचलली जावीत. यासोबतच ऑक्सिजन सिलिंडरचीही पुरेशी यादी तयार करावी. बॅकअप स्टॉक आणि मजबूत रिफिलिंगसह ऑक्सिजन सिलिंडरची पुरेशी यादी असावी, असे निर्देशात नमूद केले आहे. याचबरोबर हे सिलिंडर भरून तयार ठेवले आहेत, याचीही खात्री करावी. कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, राज्यांमध्ये लाइफ सपोर्ट उपकरणांची पुरेशी उपलब्धता असावी, असे या निर्देशात म्हटले आहे. 

Web Title: Ensure adequate buffer stock of medical oxygen: Centre to states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.