शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पैठणमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

पैठण : नगर परिषदेने शनिवारपासून शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. आज नाथ हायस्कूलसमोरील व डॉ. लोंढे रस्त्यावरील बसस्थानकालगतची जवळपास दीडशे अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली. या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली होती. न.प.ने अनेकदा सूचना देऊनही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे काढली नाहीत. नाथषष्ठी यात्रा महोत्सव व शहरातील विकासकामे डोळ्यासमोर ठेवून न.प.ने शनिवारपासून अतिक्रमणे काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. सकाळी १० वाजता प्रभारी मुख्याधिकारी सुधीर शेट्टी अतिक्रमणविरोधी पथकप्रमुख व्यंकटी पापुलवार यांच्या नेतृत्वाखाली उदय पटेल, भगवानराव कावसनकर, कैलास मगरे, शिवाजी पोटे, सुभाष तुसामकर, रऊफ शेख, मुकुंद महाजन, राजेश रांजणीकर, दगडू पगारे, खलील धांडे, राम कांदवणे, मध

पैठण : नगर परिषदेने शनिवारपासून शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. आज नाथ हायस्कूलसमोरील व डॉ. लोंढे रस्त्यावरील बसस्थानकालगतची जवळपास दीडशे अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढण्यात आली. या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली होती. न.प.ने अनेकदा सूचना देऊनही अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे काढली नाहीत. नाथषष्ठी यात्रा महोत्सव व शहरातील विकासकामे डोळ्यासमोर ठेवून न.प.ने शनिवारपासून अतिक्रमणे काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली. सकाळी १० वाजता प्रभारी मुख्याधिकारी सुधीर शेट्टी अतिक्रमणविरोधी पथकप्रमुख व्यंकटी पापुलवार यांच्या नेतृत्वाखाली उदय पटेल, भगवानराव कावसनकर, कैलास मगरे, शिवाजी पोटे, सुभाष तुसामकर, रऊफ शेख, मुकुंद महाजन, राजेश रांजणीकर, दगडू पगारे, खलील धांडे, राम कांदवणे, मधुकर कांबळे, आश्विन गोजरे यांच्यासह १०० न.प. कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. याप्रसंगी दुकानदारांनी केलेली जवळपास दीडशे कच्ची-पक्की व लहान-मोठी अतिक्रमणे ज्यामध्ये चहाची दुकाने, पानटपर्‍या, हॉटेल, जाहिरात फलके, दर्शनी भागातील बांधलेले सिमेंटे ओटे, जेसीबी यंत्राच्या साह्याने भुईसपाट केली. यामध्ये दुपारी २ वाजेपर्यंत नाथ हायस्कूलसमोरील व बसस्थानकालगत व पाठीमागची सर्वच अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. जोगदंड, फौजदार अंकुश पाटोळे, संजय सहाणे, तांबोळी, एस.के. पुरी, अंगद तिडके, बी.बी. चव्हाण, दीपाली वाघ, धटिंग, सिराज पठाण, भारत चव्हाण यांच्यासह ५० पोलीस कर्मचारी ताफा तैनात होता. अनेक वर्षांनंतर अशा पद्धतीची सरसकट अतिक्रमण हटाव मोहीम न.प.ने राबविली. त्यामुळे कारवाईला शहरवासीयांचे सहकार्य मिळाले व किरकोळ अपवाद वगळता टोकाचा विरोध झाला नाही. रविवारी ही मोहीम यात्रा मैदान व नाथ मंदिर परिसरात राबविली असल्याची माहिती न.प. सूत्रांनी दिली.