शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 05:34 IST

‘पीएलएफएस’च्या आकडेवारीनुसार, १५ वर्षांवरील वयाच्या व्यक्तींचा ग्रामीण भागातील श्रमशक्ती सहभागिता दर ५७.९ टक्क्यांवरून ६०.१ टक्के झाला आहे.

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील रोजगाराच्या स्थितीत उत्साहवर्धक सुधारणा झाली असली तरी ग्रामीण भागातील तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम असल्याचे कालबद्ध श्रम शक्ती सर्वेक्षण (पीएलएफएस) २०२३-२४ मध्ये म्हटले आहे.

‘पीएलएफएस’च्या आकडेवारीनुसार, १५ वर्षांवरील वयाच्या व्यक्तींचा ग्रामीण भागातील श्रमशक्ती सहभागिता दर ५७.९ टक्क्यांवरून ६०.१ टक्के झाला आहे. श्रमिक लोकसंख्या गुणोत्तर ५६.० टक्क्यांवरून ५८.२ टक्क्यांवर गेले आहे. बेरोजगारीचा दर ५.३ टक्क्यांवरून घसरून २.५ टक्के झाला आहे. गरिबीला सांख्यिकीय आकडेवारीच्या आड दडवण्याचा प्रयत्न करीत आहोत, असा प्रश्न यातून निर्माण होत आहे.  तरी कमी उत्पन्न गटात असलेल्या वंचित समुदायातील तरुणांसाठी रोजगार आणि सन्मानजनक व भविष्यवेधी काम यातील दरी अजूनही अलंघ्य असल्याचे दिसून येत आहे. त्यांना केवळ काम नव्हे, तर वृद्धीच्या संधी, कौशल्य सुधारणा, मार्गदर्शन आणि उद्यमांची गरज आहे.

५९.४ टक्के पुरुष स्वयंरोजगारप्राप्त

रोजगार वाढला असला तरी ग्रामीण भागातील ७३.५ टक्के महिला आणि ५९.४ टक्के पुरुष अजूनही स्वयंरोजगारप्राप्त आहेत. हे लोक वंचित घटकांतील आहेत. आपण ग्रामीण भागात खरंच सन्मानजनक संधी उपलब्ध करून देत आहोत की, गरिबीला सांख्यिकीय आकडेवारीच्या आड दडवण्याचा प्रयत्न करीत आहोत, असा प्रश्न यातून निर्माण होत आहे.

रोजगार भागीदारिता दराचे आपण कौतुक करतो; पण ते काम विनामोबदल्याचे अथवा दुर्लक्षित राहिले असेल, तर त्याला काय अर्थ आहे? ते काम करतात हे जणू मान्यच नसते. त्यांना उत्पन्न मिळत नाही, सामाजिक संरक्षण मिळत नाही, वृद्धीच्या संधी मिळत नाहीत, तरीही ‘राेजगारप्राप्त’ श्रेणीत गृहीत धरले जाते.

नीरज अहुजा, सहयोगी संचालक, ट्रान्सफॉर्म रुरल इंडिया (बेंडिंग मार्केट फॉर फ्लरिशिंग लोकॅलिटी प्रॅक्टिस, लीड- रुरल एंटरप्रिनरशिप अँड एम्प्लॉयॅबिलिटी प्रोग्राम)