शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

पूरग्रस्त बिहारला तातडीची 500 कोटींची मदत, हवाई पाहणीनंतर पंतप्रधान मोदींचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2017 12:33 PM

मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी या भागाची हवाई पाहणी केली.

पाटणा, दि. 26 - मुसळधार पावसामुळे बिहारमध्ये भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी या भागाची हवाई पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री सुशील मोदीही त्यांच्यासोबत होते. 

हवाई पाहणी केल्यानंतर पूर्णिया जिल्ह्यात वरिष्ठ अधिका-यांसोबत झालेल्या बैठकीत मोदींनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी   बिहारला तात्काळ 500 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. बिहारला आवश्यक ते सर्व सहकार्य करु तसेच नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रातून पथक पाठवण्याचेही त्यांनी आश्वासन दिले आहे. 

बिहारमधल्या या पूरामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचे बळी गेले आहेत. मागच्या काही दिवसात आसाम, बिहार, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगालला  पूराचा मोठा फटका बसला आहे. आसाममध्ये २१ जिल्ह्यातील २२.५ लाख लोकांना पुराचा फटका बसला यामध्ये 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.

बिहारमध्ये पाणीच पाणीबिहारमधील महानंदा, कंकई आदी नद्यांना पूर आला असून राज्यात पूरस्थिती आहे.  नेपाळ आणि सिमावर्ती भागातील पावसामुळे बिहारमधील नद्यांना पूर आला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी केली हवाई पाहणीउत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोण्डा, श्रावस्ती, बलरामपुर बहराइच जिल्ह्यात पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. पूरग्रस्त भागातील मदत कार्यात हयगय सहन केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. बहराइचमध्ये ऐरिया गावात त्यांनी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. कर्नलगंजमध्ये पुरात मृत्युमुखी पडलेल्या दोन नागरिकांच्या नातेवाइकांना त्यांनी प्रत्येकी चार लाख रुपये दिले.

उत्तराखंडात ढगफुटी, सहा जणांचा मृत्यूउत्तराखंडात पिथौरागढ जिल्ह्यात धारचूला भागात सोमवारी ढगफुटीच्या वेगवेगळ्या घटनात सहा जणांचा मृत्यू झाला. पहिली घटना धारचूलाच्या नाउघाट भागात घडली. स्थानिक मंगती नदीला पूर आला आणि काही दुकाने व सैन्य शिबिर वाहून गेले. जिल्हाधिकारी आशीष चौहान यांनी सांगितले की, एनडीआरएफच्या तुकडीने घटनास्थळावरुन दोन मृतदेह बाहेर काढले आहेत. तर, सैन्याचा एक जवान बेपत्ता आहे. दुसरी घटना मालपा भागात घडली. येथे स्थानिक नदीला आलेल्या पुरात चार जण वाहून गेले. त्यांचे मृतदेह नंतर सापडले. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमार