शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी आपातकालीन आराखडा महापालिका : खासगी विहरी, बोअरवेल ताब्यात घेणार

By admin | Updated: August 20, 2015 22:09 IST

पुणे : पावसाळा सुरू होऊन तब्बल अडीच महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी, शहराला पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये अवघा 50 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातच, याच पाण्यावर जिल्ह्यातील काही गावांचा पाणी पुरवठा आणि सिंचनासाठीचे पाणी अवलंबून असल्याने येत्या काही महिन्यात पाण्यावरून शहर आणि ग्रामिण असा वाद पेटणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना वापरण्यासाठी लागणा-या पाण्याचा पुरवठा शहरातील जलस्त्रोतांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी पाणी पुरवठयाचा आपातकालीन आराखडा करण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले असून वॉर्ड स्तरावर पाणी पुरवठा करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरूवारी लोकमतशी बोलताना दिली. या आपातकालीन स्थितीशी

पुणे : पावसाळा सुरू होऊन तब्बल अडीच महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी, शहराला पाणी पुरवठा करणा-या धरणांमध्ये अवघा 50 टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातच, याच पाण्यावर जिल्ह्यातील काही गावांचा पाणी पुरवठा आणि सिंचनासाठीचे पाणी अवलंबून असल्याने येत्या काही महिन्यात पाण्यावरून शहर आणि ग्रामिण असा वाद पेटणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना वापरण्यासाठी लागणा-या पाण्याचा पुरवठा शहरातील जलस्त्रोतांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी पाणी पुरवठयाचा आपातकालीन आराखडा करण्याचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतले असून वॉर्ड स्तरावर पाणी पुरवठा करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी गुरूवारी लोकमतशी बोलताना दिली. या आपातकालीन स्थितीशी सामना करण्यासाठी शहरातील खासगी विहरी, बोअवेल्स, तसेच इतर पाण्याचे जलस्त्रोत महापालिकेकडून ताब्यात घेण्यात येणार असल्याचेही नियोजन असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. तसेच धरणांमधील पाणी पिण्या व्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरण्या वरही कडक निर्बंध घालण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तसेच कालवा समितीच्या बैठकीपूर्वी हा आराखडा पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 2007 मध्ये शहरात अशाच प्रकारे पाणी टंचाईचे संकट ओढावल्यानंत़र करण्यात आलेल्या उपाय योजनांच्या धर्तीवरच हा आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
==========
प्रत्येक प्रभागासाठी सूक्ष्म नियोजन
या आराखडया अंतर्गत प्रत्येक प्रभागाच्या वापराच्या पाण्यासाठी सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यात प्रभागामध्ये असलेल्या बोअरवेल्स, खासगी विहरी, महापालिकेच्या बोअरवेल्स तसेच इतर जलस्त्रोतांची माहिती संकलीत करण्यात येत आहे. त्यानंतर या स्त्रोतांमधील किती पाणी पिण्या योग्य तर किती पिण्यासाठी अयोग्य आहे. याची तातडीने तपासणी केली जाईल. त्यानुसार, हे पाणी प्रभागांमध्ये स्वतंत्र यंत्रणा उभारून नागरिकांना वापरण्यासाठी पुरविले जाईल. तसेच ज्या ठिकाणचे पाणी पिण्यायोग्य आहे. ते पाणी टँकर द्वारे शहराच्या इतर भागांमध्ये पोहचविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्यानुसार, प्रभागांमध्ये असलेल्या जलस्त्रोतांवर सूक्ष्म नियोजन आराखडा असणार आहे.
===========
या बातमीच्या आणखी महत्वाच्या चौकटी आहेत...