प्रणव मुखर्जी : ‘ड्रॅमॅटिक डिकेड : द इंदिरा गांधी इयर्स’ पुस्तकातून टाकला प्रकाश
नवी दिल्ली : इंदिरा गांधी यांनी 1975 मध्ये लादलेली आणीबाणी टाळता आली असती; मात्र, ते दु:साहस ठरले; काँग्रेस आणि इंदिराजींना त्याची मोठी किंमत चुकवावी लागली. मूलभूत अधिकारावर घाला आणि राजकीय कार्यक्रमांना स्थगिती, मोठय़ा प्रमाणावर अटकसत्र, वृत्तपत्र आणि प्रसिद्धी माध्यमांवर आणलेल्या र्निबधामुळे जनतेवर प्रतिकूल परिणाम झाला, अशी परखड टीका राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केली आहे. त्यांनी गुरुवारी आपला 79 वा वाढदिवस साजरा केला.
मुखर्जी हे त्या काळात इंदिराजींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होते. जयप्रकाश नारायण यांनी त्या काळी सरकारविरोधी चळवळीचे नेतृत्व केले मात्र ते दिशाहीन होते, अशी टीकाही त्यांनी केली. मुखर्जी यांनी ‘ड्रॅमॅटिक डिकेड : द इंदिरा गांधी इयर्स’ या आपल्या पुस्तकात स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासावर प्रकाश टाकला असून लवकरच ते प्रकाशित होत आहे. आणीबाणी घोषित करण्यासाठी आवश्यक असलेल्या घटनात्मक तरतुदींची इंदिरा गांधी यांना जाणीव होती. सिद्धार्थ शंकर रे यांनी त्यांना तो निर्णय घेण्यास प्रवृत्त केले. रे हे त्यावेळी प. बंगालचे मुख्यमंत्री होते. त्यांनी शाह आयोगासमोर बोलताना या निर्णयाची जबाबदारी नाकारली हे त्यापेक्षाही संतापजनक होते, असेही मुखर्जी म्हणाले.(लोकमत न्यूज नेटवर्क)
4मुखजींच्या पुस्तकाच्या पहिल्या खंडात 1969 ते 8क् चा तर दुस:या खंडात 198क् ते 98 चा काळ दिला आहे. तिस:या खंडात 1998 ते 2क्12 चा काळ असून स्वत:च्या राजकीय कारकीर्दीची अखेर त्यात आहे.
4या 321 पानी पुस्तकार विविध प्रकरणो असून बांगला देश मुक्ती, जयप्रकाश यांचे आंदोलन, 1977 च्या निवडणुकीत काँग्रेसचा झालेला दारूण पराभव, काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि 198क् आणि नंतरच्या काळात सत्तेवर येणो आदींवर विस्तृत तपशील आहे.
4आणीबाणीच्या काळात सार्वजनिक जीवनात शिस्त आली यात शंका नाही. आर्थिक विकासात भर पडली. महागाईवर नियंत्रण आणतानाच व्यापारातील तूट भरून काढली गेली. विकासावरील खर्च वाढला. करबुडवेगिरी आणि तस्करीला आळा घातला गेला पण तरीही आणीबाणी टाळता आली असती, असे त्यात ठामपणो नमूद केले.