शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
7
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
8
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
9
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
10
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
11
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
12
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
13
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
14
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
16
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
17
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
18
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
19
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
20
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीची ऑनलाइन प्रक्रिया दूरच

By admin | Updated: May 5, 2014 16:32 IST

उदासीनता : शिक्षण विभागाकडून कार्यवाही नाही

उदासीनता : शिक्षण विभागाकडून कार्यवाही नाही
नाशिक : दहावीत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी आणि शहरातील महाविद्यालयांमध्ये असलेल्या अकरावीच्या जागा पाहता नाशिकमध्ये प्रवेशाची फारशी चुरस नसल्याचा निष्कर्ष शिक्षण विभागाने काढला आहे. त्यामुळे पुणे, मुंबईत होणारी अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया नाशिकमध्ये राबविणे आवश्यक नसल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
पुणे आणि मुंबईत मागील वर्षापासून ऑनलाइन पद्धतीने अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. त्यानुसार आगामी अकरावीच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाची लगबग सुरू झाली आहे. या दोन्ही शहरांतील विद्यार्थ्यांची आणि महाविद्यालयांची संख्या लक्षात घेता शिक्षण विभागाने मागील वर्षीपासून ऑनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्यास प्रारंभ केला आहे. दहावीचा निकाल जाहीर होण्यास अद्याप दोन महिन्यांचा कालावधी आहे. या कालावधीत ऑनलाइन प्रवेशाची सर्व तयारी करण्याचे काम सुरू आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीच्या प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया राबविली जाणार आहे.
पुणे, मंुबई या शहरांनंतर नाशिकमध्येही अशाच प्रकारे अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता गेल्या दोन वर्षांपासून वर्तविण्यात येत आहे. परंतु शहरातील उत्तीर्ण होणार्‍यांची संख्या आणि अकरावीच्या जागांची क्षमता लक्षात घेता तशी आवश्यकता नसल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. विद्यार्थी ठरावीक महाविद्यालयातच प्रवेशासाठी गर्दी करतात, परंतु नंतर दुसर्‍या महाविद्यालयाकडे वळतात, असा आजवरचा अनुभव असल्याने प्रवेशाची अडचण नसल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.
--इन्फो-
ऑनलाइन पद्धत केवळ पुणे-मुंबईत
अकरावीचे प्रवेश ऑनलाइन करण्याची पद्धत केवळ मुंबई आणि पुणे या शहरांत राबविली जाते. त्यांच्याकडे तेवढ्या तुकड्या आणि विद्यार्थीसंख्या असतेच, शिवाय विस्तीर्ण शहर असल्याने प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेशासाठी पोहचतीलच याची शाश्वती नसते. त्यामुळे मोठ्या शहरात हे शक्य होते. नाशिकच्या प्रवेशाच्या बाबतीत फारशी अडचण नाही. त्यामुळे आपणाला ऑनलाइन प्रवेश राबविण्याची गरज नाही. तूर्तात तरी असाच निर्णय आहे.
- नवनाथ औताडे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग