UP Election Opinion Poll: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला बसणार फटका; सर्व्हेतून समोर आला आकडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2021 20:49 IST2021-10-08T20:48:40+5:302021-10-08T20:49:12+5:30
UP Election Opinion Poll: उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखणार; सपाच्या जागा वाढणार

UP Election Opinion Poll: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला बसणार फटका; सर्व्हेतून समोर आला आकडा
लखनऊ: पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षानं कंबर कसली आहे. तर समाजवादी पक्ष आणि बहुजन समा पक्षानंदेखील संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. निवडणूक जिंकण्यासाठी अखिलेश यादव, मायावती यांच्यासह लहान पक्षदेखील कामाला लागले आहेत. काँग्रेसनं या निवडणुकीची जबाबदारी प्रियंका गांधींकडे दिली आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी-सी व्होटरनं सर्वेक्षण केलं आहे.
एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणातून महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता कायम राहणार आहे. मात्र २०१७ च्या तुलनेत भाजपच्या ६० ते ७० जागा घटू शकतात. भाजपला सर्वाधिक ४१ टक्के मतं मिळतील असं सर्वेक्षण सांगतं. तर समाजवादी पक्षाला ३२ टक्के, बसपला १५ टक्के मतदान होईल, असं सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. प्रियंका गांधींनी पूर्ण जोर लावूनही काँग्रेसला केवळ ६ टक्केच मतं मिळू शकतात.
कोणाला किती जागा मिळतील?
भाजप- २४१ ते २४९
सप- १३० ते १३८
बसप- १५ ते १९
काँग्रेस- ३ ते ७
अन्य- ० ते ४
मुख्यमंत्री म्हणून कोणाला पसंती?
योगी आदित्यनाथ- ४१ टक्के
अखिलेश यादव- ३१ टक्के
मायावती- १७ टक्के
प्रियंका गांधी- ४ टक्के