इव्हीएमबाबत निवडणूक आयोगाने घेतले हे महत्त्वपूर्ण निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 06:47 PM2019-03-10T18:47:40+5:302019-03-10T18:48:24+5:30

गेल्या काही निवडणुकांपासून इव्हीएमच्या विश्वासार्हतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने इव्हीएमबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

Election Commission has taken an important decision about EVMs | इव्हीएमबाबत निवडणूक आयोगाने घेतले हे महत्त्वपूर्ण निर्णय 

इव्हीएमबाबत निवडणूक आयोगाने घेतले हे महत्त्वपूर्ण निर्णय 

Next

नवी दिल्ली -  गेल्या काही निवडणुकांपासून इव्हीएमच्या विश्वासार्हतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने इव्हीएमबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. व्हीव्हीपॅट मशीनचा सार्वत्रिक वापर करण्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच इव्हीएमसोबत छेडछाड होऊ नये यासाठी प्रत्येक इव्हीएमवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच यावेळी इव्हीएम मशीनवर उमेदवाराचे छायाचित्रही लावण्यात येणार आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. 11 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा पहिला तर 19 मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल. तर 23 मे रोजी मतमोजणी होईल. 

दरम्यान, निवडणूक आयोगाने इव्हीएमची विश्वासार्हता वाढवण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यानुसार यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. व्हीव्हीपॅट मशीनचा सार्वत्रिक वापर करण्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच इव्हीएमसोबत छेडछाड होऊ नये यासाठी प्रत्येक इव्हीएमवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच यावेळी इव्हीएम मशीनवर उमेदवाराचे छायाचित्रही लावण्यात येणार आहे. 



 

Web Title: Election Commission has taken an important decision about EVMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.