शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

UP Election 2022 : प्रवक्ता आणि कोऑर्डिनेटरच्या नियुक्तीसाठी काँग्रेस घेतेय परीक्षा, विचारले जातायत असे प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 19:24 IST

सर्व जिल्ह्यांसाठी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत, त्यांत 10 प्रश्न बहुपर्यायी आहेत. तर 2 प्रश्न लेखी स्वरुपाचे आहेत. मात्र, लखनौसाठी प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न काहीसा वेगळा होता.

मिशन 2022 (UP Election 2022) च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये 1-1 प्रवक्ता आणि कोऑर्डिनेटर बनविण्यात व्यस्त आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस यासाठी परीक्षा आणि मुलाखतीही घेत आहे. यातच, मंगळवारी यूपी काँग्रेसने लखनऊमध्ये प्रवक्ता आणि कोऑर्डिनेटर नियुक्त करण्यासाठी एक परीक्षा आणि मुलाखत आयोजित केली होती. यात 16 जणांनी भाग घेतला होता. यांपैकी 9 जण आधीपासूनच काँग्रेसमध्ये होते. तर 7 जणांनी आजच पक्ष कार्यालयात काँग्रेसचे सदस्यत्व घेतले आणि नंतर परीक्षा आणि मुलाखत दिली. (Congress took the examination to appoint spokesperson and coordinator)

असा आहे प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न -सर्व जिल्ह्यांसाठी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत, त्यांत 10 प्रश्न बहुपर्यायी आहेत. तर 2 प्रश्न लेखी स्वरुपाचे आहेत. मात्र, लखनौसाठी प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न काहीसा वेगळा होता. येथे लेखी उत्तरांसाठी 2 प्रश्न विचारले गेले, तर बहुपर्यायी प्रश्न 10 ऐवजी 15 होते.

काय विचारण्यात आले प्रश्न -परीक्षा देणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परीक्षेत काँग्रेसच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या इतिहासाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. याशिवाय, काँग्रेस सरकारच्या कामगिरीसंदर्भात आणि उत्तर प्रदेशच्या, विशेषतः संबंधित जिल्ह्याच्या राजकीय दृष्टिकोनातून आणि भौगोलिक स्थितीसंदर्भातही प्रश्न विचारण्यात आले.

योगी सरकारच्या कामगिरीवरही विचारण्यात आले प्रश्न - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगी सरकारच्या अपयशासंदर्भातही परीक्षेत प्रश्न विचारण्यात आले. कोरोना काळासंदर्भातही प्रश्न विचारण्यात आले. परीक्षेचे समन्वयक आणि पक्षाचे प्रदेश प्रवक्ते डॉ. उमाशंकर पांडे म्हणाले, लखनौ विभागातील सर्व जिल्ह्यांची परीक्षा 21 नोव्हेंबरला लखीमपूर जिल्ह्यासह पूर्ण होईल. यानंतर 23-24 नोव्हेंबरपर्यंत या विभागाचा निकाल घोषित केला जाईल. तसेच 15-20 दिवसांत संपूर्ण राज्यात एकाच वेळी परीक्षा घेण्याची योजना आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसexamपरीक्षाUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ