शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

UP Election 2017 : पाचव्या टप्प्याने वाढविली राजकीय पक्षांची चिंता

By admin | Updated: March 2, 2017 13:09 IST

पाचव्या टप्प्यातील मतदान ६० टक्क्यांपेक्षाही कमी झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत

लखनौ : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान ६० टक्क्यांपेक्षाही कमी झाल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत आणि अंदाज बांधण्याला सुरुवात झाली आहे.भाजपा, बसपा आणि काँग्रेस-सपा सर्वच पक्ष कमी मतदानाचा आपल्या संभाव्य कामगिरीवर अंदाज बांधत आहेत. पाचव्या टप्प्यात ११ जिल्ह्यांमधील ५१ जागांसाठी ५७.३६ टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपा नेते वरुण गांधी यांच्या लोकसभा मतदारसंघातील अमेठी आणि सुलतानपूर येथेही मतदानाची टक्केवारी कमीच राहिली. अमेठीत ५६.२५ टक्के आणि सुलतानपूर येथे ५६.३५ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.या दोन जिल्ह्यांशिवाय सिद्धार्थनगर (५१.८२ टक्के), संत कबीरनगर (५२.३१ टक्के), बलरामपूर (५४.२५ टक्के) आणि गोनडा (५६.७३ टक्के) या सहा जिल्ह्यांमध्येही मतदान कमीच राहिले. आपलेच मतदार मोठ्या संख्येत मतदान केंद्रावर आले आणि विरोधकांचे मतदार फिरकलेच नाहीत, असा दावा प्रत्येक पक्ष करीत आहे.सपा आणि काँग्रेस हे दोघेही आपल्या परंपरागत मतदारांवर निर्भर आहेत तर बसपाला दलित मतदारांवर विश्वास आहे. भाजपा निश्चिंत आहे. ज्या भागांत कमी मतदान झाले तो भाग मुस्लीमबहुल असल्याने आपल्याला चिंता नाही, असे भाजपा नेते सांगत आहेत. (वृत्तसंस्था)