वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 17:44 IST2025-07-17T17:37:08+5:302025-07-17T17:44:28+5:30

Uttar Pradesh News: प्रेमाचं प्रतीक असलेल्या आग्रा येथील ताज महालाला पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. दरम्यान, याच ताजमहालाजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील कार पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये एक वृद्ध व्यक्ती बेशुद्धावस्थेमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Elderly man tied up and forced into a car, then family enjoyed visiting Taj Mahal, disaster averted as security guard watched | वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   

वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   

प्रेमाचं प्रतीक असलेल्या आग्रा येथील ताज महालाला पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. दरम्यान, याच ताजमहालाजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील कार पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमध्ये एक वृद्ध व्यक्ती बेशुद्धावस्थेमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. या वृद्धाला कपड्यांनी बांधून ठेवलेले होते. बराचवेळ कारमध्ये कोंडूर राहिल्याने वृद्धाची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ताजमहालाच्या पार्किंगमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका गार्डला एक कार संशयास्पद स्थितीत उभी असल्याचं दिसून आलं. त्याने आत डोकावून पाहिलं असता कारमध्ये एक वृद्ध व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडलेली होती. त्यांचे हातपाय बांधलेले होते. त्यामुळे प्रकरण संशयास्पद बनले. त्यामुळे सदर गार्डने इतर कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलावून कारची काच तोडून सदर वृद्धाला बाहेर काढले.

या वृद्ध व्यक्तीला बाहेर काढून पाणी पाजण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती बिघडलेली होती. त्यामुळे ते काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. अखेर एका रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या वृद्धाला कारमध्ये डांबून कुटुंब चित्रपट पाहायला गेले, असा दावाही केला जात आहे.या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक टुरिस्ट गाईल मोहम्मद अस्लम यांनी सांगितले की, कारमध्ये एक वृद्ध व्यक्ती होती. ते काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांचे हातपाय बांधलेले होते.

दरम्यान, या कारवर महाराष्ट्रामधील नंबर प्लेट असल्याचे आणि महाराष्ट्र शासन अशी पाटी लावलेली होती, अशी माहिती समोर येत आहे. तसेच कारच्या वर सामानसुद्धा बांधलेलं होतं. त्यामुळे एखादं कुटुंब महाराष्ट्रामधून आग्रा येथे फिरायला आलं असावं, तसेच त्यांनी काही कारणास्तव वृद्ध व्यक्तीला कारमध्ये बंद करून ठेवलं असावं, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, आता पोलीस कारमालकाचा शोध घेत असून, या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. 

Web Title: Elderly man tied up and forced into a car, then family enjoyed visiting Taj Mahal, disaster averted as security guard watched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.