शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
2
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
3
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
4
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
5
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
6
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
7
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या
8
पाकिस्तानच्या अडचणीत आणखी वाढ! पीठ, डाळींच्या किंमती वाढणार; IMF'ने मदत केली नाही
9
"कॉम्प्रोमाइज कर...", वयाच्या १७व्या वर्षी जुही परमारला करावा लागला होता कास्टिंग काउचचा सामना
10
हिंडेनबर्गच्या झटक्यातून बाहेर आली Adani ची 'ही' कंपनी, तोटा भरुन काढला; शेअर्समध्ये वाढ
11
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
12
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
13
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
14
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
15
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
16
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
17
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
19
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
20
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!

Eknath Shinde Help to Flood Victims: आसाममधील पूरग्रस्तांसाठी 'शिंदे गटाचा' पुढाकार; 51 लाखांची मदत करण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 11:48 AM

Eknath Shinde And Assam Flood : आसामला पावसाचा तडाखा बसला आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 'शिंदे गटाने' पुढाकार घेतला आहे. 

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा पत्राच्या माध्यमातून परत येण्याचं आवाहन केल्यानंतरही शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे सत्तापेच शिगेला पोहोचला आहे. या संपूर्ण राजकीय पेचात आता राज्यपाल केंद्रस्थानी आले असून त्यांची भूमिका महत्वाची असणार आहे. तसंच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आज मुंबईत परतणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. तर दुसरीकडे आसामला पावसाचा तडाखा बसला आहे. गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आसाममधील पूरग्रस्तांच्या (Assam Flood) मदतीसाठी 'शिंदे गटाने' पुढाकार घेतला आहे. 

एकनाथ शिंदे गटाकडून आसाममधील पूरग्रस्तांना 51 लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय" असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आसाममध्ये पुराचे थैमान पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मोठ्या प्रमाणात घरांचं नुकसान झालं असून लाखो लोकांना पुराचा फटका बसला आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भबानीपूर भागातील पूरग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी बजली येथील चारलपारा नयापारा येथील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. पुरामुळे आसाममधील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये लाखो लोकांना पुराच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. याच दरम्यान अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे आसाम सरकार पूरग्रस्तांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. आसाममध्ये पुरामुळे जवळपास 134 लोकांचा मृत्यू झाला आहे. पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री पाण्यात उतरले आहेत. 

आसामला पुराचा तडाखा! लोकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उतरले पाण्यात; 134 जणांचा मृत्यू

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पुरामुळे 8 जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, राज्यात 21 लाखांहून अधिक लोक बाधित झाले आहेत. राज्यातील विविध पूरग्रस्त भागात मदत साहित्य पाठवण्यात येत आहे. नागाव जिल्ह्याचे जिल्हा उपायुक्त निसर्ग हिवरे यांनी सांगितले की, राज्य सरकार बाधित भागात मदत साहित्य पुरवत आहोत. मदतकार्य सुरू आहे. आसाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मते, राज्यातील 22 जिल्ह्यांमधील 21.52 लाख लोकांना याचा फटका बसला आहे, आदल्या दिवशी 28 जिल्ह्यांमध्ये 22.21 लाख होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बहुतांश नद्यांची पाणी पातळी कमी होत आहे. मात्र नागावमधील कोपिली, कछारमधील बराक आणि करीमगंजमधील करीमगंज आणि कुशियारा धोक्याची पातळी ओलांडून  वाहत आहेत.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाAssam Floodआसाम पूरAssamआसाम