शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
2
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
3
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
4
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
5
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
6
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
7
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
8
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
9
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
10
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
11
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
12
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
13
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
14
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
15
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
16
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
17
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
18
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
20
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली

एकतर सैन्याची नोकरी सोडा किंवा फेसबुक; याचिकाकर्त्या लेफ्टनंट कर्नलला न्यायालयाने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 21:15 IST

गलवान खोऱ्यातील हल्ल्यानंतर भारताने चीनच्या 69 अ‍ॅपवर बंदी आणली होती. यामध्ये टिकटॉक, युसी ब्राऊझरही आहेत. आता सैन्यदलाने Facebook, TikTok, Truecaller आणि Instagram सह 89 अ‍ॅप तातडीने डिलीट करण्याचे आदेश जवानांना दिले आहेत.

नवी दिल्ली : सुरक्षेला धोका असल्याने भारतीय सैन्याने काही दिवसांपूर्वीच फेसबूक, इन्स्टाग्रामसह 89 अॅपच्या वापरावर बंदी आणली आहे. यामुळे अनेक जवान ही अॅप डिलीट करत आहेत. मात्र, एका लेफ्टनंट कर्नलने या आदेशाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करत फेसबुक वापरण्याची परवानगी मागितली आहे. यावर न्यायालयाने त्यांना चांगलेच सुनावले आहे. 

गलवान खोऱ्यातील हल्ल्यानंतर भारताने चीनच्या 69 अ‍ॅपवर बंदी आणली होती. यामध्ये टिकटॉक, युसी ब्राऊझरही आहेत. आता सैन्यदलाने Facebook, TikTok, Truecaller आणि Instagram सह 89 अ‍ॅप तातडीने डिलीट करण्याचे आदेश जवानांना दिले आहेत. भारतीय सैन्यदलाने चीनविरोधात मदत करणाऱ्या अमेरिकेच्या अ‍ॅपविरोधात मोहिम उघडली आहे. यामध्ये अमेरिकेचे फेसबुक, इन्स्टाग्रामसारखी अ‍ॅप आहेत. अशा 89 अॅपवर भारतीय सैन्यदलाने माहिती चोरत असल्याचा आक्षेप घेतला असून ही अ‍ॅप जवानांनी आपल्या मोबाईलमधून तातडीने डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये वुईचॅट, हाईकसारखी मेसेंजर अ‍ॅप आहेत. तर पब्जीसारखे गेमिंग अ‍ॅपही आहेत. डेटिंग अ‍ॅपमध्ये टिंडर, ओकेक्युपीड आदी अ‍ॅप आहेत. तसेच डेली हंट हे न्यूज अ‍ॅपही डिलीट करण्यास सांगितले आहे, असे लष्कराच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितले आहे. 

याविरोधात लेफ्टनंट कर्नल पी. के. चौधरी यांनी फेसबुकसह या अॅपचा वापर न करण्याच्या आदेशाविरोधात उच्च न्य़ायालयात याचिका दाखल केली होती. चौधरी यांनी याचिकेत म्हटले होते की, फेसबुक अकाऊंट बंद केल्यास त्यांचा सर्व डेटा आणि मित्रांसोबतचा संपर्क तुटणार आहे. जो पुन्हा मिळविणे कठीण जाईल. यावर खंडपीठाने माफ करा, तुम्ही हे बंद करा. तुम्ही कधीही नवीन अकाऊंट उघडू शकता. तुम्ही एका जबाबदार संस्थेचे हिस्सा आहात. त्यांचा आदेश मानावाच लागले. असे चालणार नाही, असे सांगितले. तसेच ही याचिका फेटाळताना दोन सदस्यीय खंडपीठाने चौधरी यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले. एकतर तुम्ही सैन्यदलाच्या आदेशाचे पालन करा किंवा राजीनामा द्या. 

न्यायमूर्ती राजीव सहाय एंडलॉ आणि न्यायमूर्ती आशा मेनन यांच्या खंडपीठाने या याचिकेवर विचार करण्यासाठी एकही कारण नाही. खासकरून जेव्हा प्रकरण देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. जर तुम्हाला फेसबुक आवडत असेल तर तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे, अशा शब्दांत सुनावले आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

बापरे! लग्नासाठी व्हर्जिनीटीची गॅरंटी देतेय मॅट्रिमोनियल साईट Shadi.com; विचारताच माफी मागितली

'वर्क फ्रॉम होम' काळात SBI चा मोठा निर्णय; तब्बल 1000 कोटी रुपये वाचणार

Xiaomi आता 'हवा' देखील भरणार; टायर पंक्चर झाल्यास काही क्षणांत मदतीला येणार

काँग्रेसने हटविले, सचिन पायलटांना लगेचच भाजपची खुली ऑफर

रेखा यांचा कोरोना चाचणीस नकार; मुंबई महापालिकेच्या पथकाला दरवाजाही उघडला नाही

क्रूरतेचा कळस! चीनने गलवानमध्ये मृत सैनिकांचे बलिदान नाकारले; अंत्यसंस्कारास नकार

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानHigh Courtउच्च न्यायालय