धक्कादायक! नेपाळच्या रिसॉर्टमध्ये सापडले केरळच्या 8 पर्यटकांचे मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 03:19 PM2020-01-21T15:19:29+5:302020-01-21T15:31:02+5:30

केरळच्या 8 पर्यटकांचा नेपाळमध्ये मृत्यू झाला आहे.

Eight tourists from Kerala die at Nepal resort | धक्कादायक! नेपाळच्या रिसॉर्टमध्ये सापडले केरळच्या 8 पर्यटकांचे मृतदेह

धक्कादायक! नेपाळच्या रिसॉर्टमध्ये सापडले केरळच्या 8 पर्यटकांचे मृतदेह

Next
ठळक मुद्देकेरळच्या 8 पर्यटकांचा नेपाळमध्ये मृत्यू झाला आहे. नेपाळच्या दमनमधील एका रिसॉर्टमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ. गॅस हिटरमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

काठमांडू - केरळच्या 8 पर्यटकांचा नेपाळमध्येमृत्यू झाला आहे. नेपाळच्या रिसॉर्टमध्ये आठ पर्यटकांचे मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पर्यटक हे फिरण्यासाठी नेपाळला आले होते. मंगळवारी (21 जानेवारी) नेपाळच्या दमनमधील एका रिसॉर्टमध्ये पर्यटकांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. गॅस हिटरमुळे मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

नेपाळमध्ये पर्यटनासाठी केरळमधील काही लोक आले होते. त्यातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. रिसॉर्टमधील गॅस हिटरमुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. रुममधील हिटर चालू असून दरवाजा आणि खिडक्या बंद होत्या. त्यामुळे गुदमरून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मंगळवारी रिसॉर्टमध्ये बेशुद्ध अवस्थेत पर्यटक सापडले. त्यांना रुग्णालयात हलवण्यासाठी हेलिकॉप्टर मागवण्यात आलं. मात्र काठमांडू येथील रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

'पुस्तक झालं आता व्हिडीओ आला'; छत्रपती संभाजीराजे संतापले

तुकडे तुकडे गँग अस्तित्वातच नाही, मोदी सरकारचा खुलासा

Delhi Election : ...म्हणून केजरीवालांना दाखल करता आला नाही उमेदवारी अर्ज

Video: मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; ट्वविटरवरील 'त्या' व्हिडीओमुळे संताप

आंध्र प्रदेशच्या आता तीन राजधान्या, देशातील पहिलाच प्रयोग

Delhi Election : भाजपाला मोठा धक्का; शिवसेनेनंतर आणखी एका पक्षाने 21 वर्षांची साथ सोडली

 

Web Title: Eight tourists from Kerala die at Nepal resort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.