शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये संचारबंदीतच ईद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2016 03:52 IST

काश्मीर खोऱ्यात यंदा ईद-उल-अझाचा नेहमीचा आनंद कुठे तरी हरवल्याचे दिसते. मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या ईदच्या आदल्या दिवशी बाजारपेठेत तुरळक गर्दी दिसली.

श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात यंदा ईद-उल-अझाचा नेहमीचा आनंद कुठे तरी हरवल्याचे दिसते. मंगळवारी साजऱ्या होणाऱ्या ईदच्या आदल्या दिवशी बाजारपेठेत तुरळक गर्दी दिसली. गेल्या ९ जुलैपासून खोऱ्यात हिंसाचार आणि संचारबंदी असल्यामुळे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले आहेत. काही रस्त्यांवर (विशेषत: सेंट्रल सिटीचा लाल चौक आणि परिसर) मोजकी खासगी वाहने ये-जा करताना दिसतात. बेकरी, मिठाई आणि तयार कपड्यांच्या दुकानांत ग्राहकांची गर्दी नाही. कारण ती बंदच आहेत. मंगळवारी काश्मीर खोऱ्यातील सर्व दहाही जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.रेसिडेन्सी रोडवरील प्रसिद्ध मॉडर्न स्वीट्सच्या मालकाने यंदा ‘ईदला बेकरी उपलब्ध नाही’ असा फलकच लावला आहे. याच दुकानाच्या शेजारचे शक्ती स्वीट्सदेखील बंदच आहे. तथापि, ईदनिमित्त बळी द्यायच्या जनावरांची विक्री अनेक ठिकाणी सुरू आहे. ईद उल अझाच्या आदल्या सायंकाळी आम्ही जी विक्री करतो, त्याच्या तुलनेत यंदाची दहा टक्केही नाही व ईद काही तासांवर आली असताना विक्री वाढेल, अशी कोणतीही शक्यता आम्हाला दिसत नाही, असे जनावरे विकणारे अल्ताफ अहमद यांनी सांगितले.संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांची काश्मीरमध्ये अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यासाठी फुटीरवाद्यांचा मंगळवारी संयुक्त राष्ट्रांच्या लष्करी निरीक्षक गटाच्या येथील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा विचार आहे. (वृत्तसंस्था)जम्मू : सुरक्षा दलाने पूंछ जिल्ह्यात सोमवारी आणखी एका अतिरेक्याला ठार मारले. रविवारपासून सुरू झालेल्या या चकमकीत आतापर्यंत चार अतिरेक्यांना मारण्यात यश आले आहे. पूंछच्या मिनी सचिवालयाजवळ गोळीबार सुरू असून, ही मोहीमही अद्याप सुरू आहे. संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आणखी एका अतिरेक्याला ठार मारण्यात आले आहे. आज सकाळपासून तेथून गोळीबाराचे आवाज येत होते. त्यामुळे स्थानिक रहिवासी घराच्या बाहेर पडूच शकले नाहीत. राजौरी-पूंछ विभागाचे प्रभारी पोलीस महासंचालक जॉन विलियम्स यांनी सांगितले की, एका घरातून आणखी एका अतिरेक्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. याच ठिकाणी रविवारी एक अतिरेकी मारला गेला होता. सुरक्षा दल आणि या चार अतिरेक्यांत रविवारी दिवसभर मिनी सचिवालयाजवळ चकमक सुरू होती. ग्रेनेड हल्ल्यात एक जण ठार अनंतनाग जिल्ह्यात अतिरेक्यांनी सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास एका पोलीस चौकीवर केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात एक नागरिक ठार, तर तीन पोलिसांसह नऊ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले, अतिरेक्यांनी येथून ५५ कि.मी. दूर शेरबाग भागात पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला केला. नागरिक बकरी ईदच्या निमित्ताने खरेदीसाठी बाहेर पडले होते त्याचवेळी हा हल्ला झाला. रस्त्यावर ग्रेनेड फुटले. यात बिलाल अहमदसह दहा जण जखमी झाले. उपचार सुरू असताना बिलाल अहमदचा मृत्यू झाला. जखमींपैकी तीन पोलिसांची प्रकृती गंभीर आहे.