'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:43 IST2025-08-11T15:38:58+5:302025-08-11T15:43:29+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील महागड्या शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. या दोन्ही गोष्टी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत, असे ते म्हणाले. 

'Education, health have gone beyond the reach of the common man in India'; RSS chief Bhagwat expresses concern | 'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता

'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता

देशात प्रचंड महागलेले शिक्षण आणि खर्चिक आरोग्य सुविधा याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली आहे.  चांगल्या आरोग्य सुविधा स्वस्तात आणि सहज मिळायला हव्यात, असे म्हणत सरसंघचालक भागवत यांनी या मुद्द्यावर केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

सरसंघचालक मोहन भागवत यांनी इंदूरमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये हे भाष्य केले. 

"सगळ्यांना सर्वात जास्त गरज असते ती, आरोग्य आणि शिक्षणाची. पण, दुर्दैवाने परिस्थिती अशी आहे की, या दोन्हीही गोष्टी आज सर्वसामान्य माणसापासून दूर आहेत आणि आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत", असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.  

 "समाजाला आज अशा आरोग्य सुविधा हव्यात आहेत ज्या सहजपणे आणि स्वस्तात मिळतील. त्यासाठी अधिक जागा हव्या. बाजारीकरणामुळे केंद्रीकरणही होत आहे", अशी भूमिका त्यांनी मांडली. 

कुटुंब चिंतेत असते की पुढे काय होईल -भागवत

"चांगले उपचार हवे असतील, तर लोकांना शहरांमध्ये जावं लागतं. कर्करोगावर उपचार होतात, असे भारतात आठ-दहाच शहरे आहेत. तिथे लोकांना जावं लागतं. तिथे उपचारांचा खर्च वेगळा असतो. तिथे येण्या-जाण्याचे खर्च वेगळा असतो. तिथ राहायचा खर्च असतो. कुटुंब चिंतेत असते की, पुढे काय होईल. एकाच वेळी या सगळ्या गोष्टी होत असतात", असे सरसंघचालक भागवत म्हणाले.   

"आपण बघतो की, माणूस आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी घरही विकतो, पण तो चांगले शिक्षण देतो. चांगल्या ठिकाणी उपचार घेता यावेत म्हणूनही घर विकतो आणि त्याची व्यवस्था करतो", असेही ते म्हणाले. 

Web Title: 'Education, health have gone beyond the reach of the common man in India'; RSS chief Bhagwat expresses concern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.