भूपेश बघेलांच्या घरावर ED चा छापा, मोठी रोकड जप्त; नोटा मोजण्याची मशीन मागवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 18:02 IST2025-03-10T18:02:22+5:302025-03-10T18:02:50+5:30

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या घरावर ईडीने छापा टाकला.

ED raids former CM Bhupesh Baghel's house, seizes huge cash | भूपेश बघेलांच्या घरावर ED चा छापा, मोठी रोकड जप्त; नोटा मोजण्याची मशीन मागवली

भूपेश बघेलांच्या घरावर ED चा छापा, मोठी रोकड जप्त; नोटा मोजण्याची मशीन मागवली


Bhupesh Baghel : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि दिग्गज काँग्रेस नेते भूपेश बघेल यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापा टाकला. यादरम्यान, ईडीच्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर रोकड सापडल्याची माहिती समोर आली आहे. ही रोकड मोजण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी दोन कॅश काऊंटिंग मशीन मागवल्या आहेत. अधिकाऱ्यांना भूपेश बघेल यांचा मुलगा चैतन्य याच्या घरातून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि कागदपत्रेही जप्त केली आहेत. 

हे प्रकरण मद्य घोटाळ्याशी संबंधित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चैतन्य बघेल यांना लवकरच चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते. आजपासूनच चौकशीची पहिली फेरी सुरू होण्याची शक्यता आहे. चैतन्य बघेल यांच्याविरोधात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे ईडीने छापे आणि कारवाई केली आहे. चैतन्यचा 2100 कोटी रुपयांच्या मद्य घोटाळ्याशी संबंध असल्याचा संशय आहे.

2019 ते 2022 दरम्यान 2,161 कोटींचे घोटाळे 
छत्तीसगडमधील कथित मद्य घोटाळ्याच्या तपासाला गती देण्यासाठी ईडीने आज चैतन्य बघेल आणि राज्यातील अन्य 14 ठिकाणांवर छापे टाकले. ही कारवाई 2019 ते 2022 दरम्यान राज्यात झालेल्या सुमारे 2,161 कोटी रुपयांच्या घोटाळ्याशी संबंधित आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अधिकाऱ्यांना असे काही पुरावे मिळाले आहेत, ज्यामुळे संशयाची सुई चैतन्य बघेलकडे फिरत आहे. 

ED ने 2023 मध्ये तक्रार दाखल केलली
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जुलै 2023 मध्ये या मद्य घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये रायपूरचे महापौर एजाज ढेबर यांचे भाऊ अन्वर ढेबर, माजी IAS अधिकारी अनिल तुटेजा आणि छत्तीसगड स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (CSM) चे व्यवस्थापकीय संचालक अरुणपती त्रिपाठी यांसारख्या प्रमुख लोकांची नावे होती. एजन्सीने आरोप केला की, या लोकांनी घोटाळा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामध्ये खरेदी प्रक्रियेत फेरफार करणे आणि निवडक मद्य उत्पादकांकडून कमिशन घेणे समाविष्ट आहे. कथित भ्रष्टाचारामुळे सरकारी तिजोरीचे 2,161 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.

Web Title: ED raids former CM Bhupesh Baghel's house, seizes huge cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.