शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

पीएम नरेंद्र मोदी सिनेमाला निवडणूक आयोगाची नोटीस, 30 मार्चपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 14:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपट पीएम नरेंद्र मोदी यावर दिवसेंदिवस वाद वाढत चाललेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असणारा चित्रपट पीएम नरेंद्र मोदी यावर दिवसेंदिवस वाद वाढत चाललेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे.  निर्मात्यांनी 30 मार्चपर्यंत आपलं म्हणणं मांडावे असं निवडणूक आयोगाकडून बजावण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान 5 एप्रिल 2019 पीएम नरेंद्र मोदी या सिनेमा रिलीज होणार आहे. ऐन निवडणुकीच्या दरम्यान चित्रपट प्रदर्शित झाला तर हे निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन ठरेल अशा तक्रारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने याचे स्पष्टीकरण चित्रपट निर्मांत्याकडून मागवलं आहे.

दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी लेखी तक्रार देत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पीएम नरेंद्र मोदी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे त्याचा विरोध करत या सिनेमावर निवडणूक आयोगाने बंदी आणावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने पीएम नरेंद्र मोदी सिनेमाचे निर्माते, म्युझिक कंपनी यांना नोटीस पाठवली आहे. पीएम नरेंद्र मोदी सिनेमा 19 मे नंतर रिलीज करण्यात यावा अशीही मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे. या चित्रपटाची निर्मिती संदीप सिंह आणि सुरेश ओबेरॉय यांनी केली आहे. सिनेमामध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुख्य भूमिका साकारली आहे.

 डीएमके आणि मनसेही केला विरोध पीएम नरेंद्र मोदी सिनेमामध्ये एका सामान्य कुटुंबापासून ते पंतप्रधानपदापर्यंतचा नरेंद्र मोदी यांचा जीवन प्रवास दाखविण्यात आला आहे. मागील महिन्यात या सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या ट्रेलरनंतर विरोधी पक्षाने या सिनेमावर आक्षेप घेतला. काँग्रेससोबत डीएमके आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनीही या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणी केली. तर मनसेने पीएम नरेंद्र मोदी हा सिनेमा आचारसंहितेचे उल्लंघन करणारा आहे त्यामुळे जर हा सिनेमा प्रदर्शित झाला तर खळ्ळखट्याक आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.    

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVivek oberoyaविवेक ऑबेरॉयNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसMNSमनसेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग